
थोडक्यात महत्वाचे :
चार वर्षांनी राज्यसभा निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये चार रिक्त राज्यसभा जागांसाठी 24 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
गुलाम नबी आझादनंतरची पहिली निवडणूक: 2021 मध्ये आझाद आणि इतर सदस्य निवृत्त झाल्यापासून जागा रिक्त होत्या. आता विधानसभा अस्तित्वात असल्याने निवडणूक शक्य झाली आहे.
राजकीय समीकरणे: मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला बहुमत तर भाजप प्रमुख विरोधी पक्ष ठरला. राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीवर सर्वांचे लक्ष आहे.
Rajya Sabha Elections in Jammu and Kashmir : माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या निवृत्तीनंतर तब्बल चार वर्षांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यसभेची निवडणूक होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने चार जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक होणार आहे.
आझाद यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ 15 फेब्रुवारी 2021 मध्ये संपला आहे. त्यांच्यासोबत नाझीर अहमत लवाय हेही त्याच दिवशी निवृत्त झाले होते. तर त्यांच्याआधी मीर मोहम्मद फैयाज आणि समशेर सिंग हे 10 फेब्रुवारी 2021 मध्ये निवृत्त झाले होते. तेव्हापासून राज्यातील या चार जागा रिक्त आहेत.
राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर आझाद यांना काँग्रेसने अन्य कोणत्याही राज्यातून राज्यसभेसाठी संधी दिली नाही. त्यानंतर त्यांनी 2022 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मागील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. अनेक वर्षे राज्याचा कारभार नायब राज्यपाल पाहत होते. राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभा अस्तित्वात नसल्याने ही निवडणूक रखडली होती.
आयोगाने बुधवारी चार जागांसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 6 ऑक्टोबरला निवडणुकीचे नोटिफिकेशन जारी केले जाईल. तर 24 ऑक्टोबरला मतदान आणि मतमोजणी होईल. एकाचवेळी चार जागांसाठी मतदान होणार असले तरी दोन जागा एका कॅटेगरी आणि उर्वरित दोन जागा प्रत्येकी एका कॅटेगरीमध्ये असणार आहेत. त्यामुळे तीन कॅटेगरीत ही निवडणूक होणार असून त्यासाठी स्वतंत्र मतदान करता येणार आहे.
मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले आहे. ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री आहेत. तर भाजप 29 जागा मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Q1: जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभा निवडणूक इतक्या उशिरा का होत आहे?
A: 2021 नंतर विधानसभा अस्तित्वात नसल्याने निवडणूक रखडली होती.
Q2: किती जागांसाठी निवडणूक होणार आहे?
A: एकूण 4 जागांसाठी, पण तीन वेगवेगळ्या कॅटेगरीतून मतदान होईल.
Q3: मतदान कधी होणार आहे?
A: 24 ऑक्टोबर 2025 रोजी मतदान आणि मतमोजणी होईल.
Q4: सध्याचे राजकीय समीकरण काय आहे?
A: नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी बहुमतावर आहे, तर भाजप विरोधी पक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.