Prashant Kishor : प्रशांत किशोरांकडून पक्षाची घोषणा; अध्यक्षपदी मनोज भारती, निवडणुकीची रणनीती ठरली

Jan Suraaj Party Assembly Election Manoj Bharti : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी कंबर कसली आहे.
Manoj Bharti, Prashant Kishor
Manoj Bharti, Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री झाली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जन सुराज पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या पहिल्या नेत्याचे नावही जाहीर केले आहे.

प्रशांत किशोर यांनी मनोज भारती यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पटना येथे पक्षाच्या स्थापना अधिवेशनात त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. या माध्यमातून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

Manoj Bharti, Prashant Kishor
Amit Shah : मित्रपक्षांना जिंकवा, असे सांगण्याची वेळ अमित शाह यांच्यावर कुणी आणली?

कार्यकारी अध्यक्ष मनोज भारती हे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. ते दलित समाजातील असल्याने प्रशांत किशोर यांनी जातीय समीकरणाच विचार केल्याचे दिसते. पण यावेळी बोलताना त्यांनी भारती हे दलित आहेत, म्हणून त्यांची निवड केली नाही, तर ते त्या योग्यतेचे असल्याने नियुक्ती केल्याचा म्हटले आहे.

मार्च महिन्यात नवे अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मागील काही महिन्यांपासून प्रशांत किशोर नव्या पक्षाच्या बांधणीच्या तयारीला लागले होते. तसेच दलित अध्यक्ष असतील, असे संकेतही त्यांनी दिले होते. त्यानंतर मधुबनी येथील मनोज भारती यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांनी अनेक देशांमध्ये राजदूत म्हणून काम केले आहे.

Manoj Bharti, Prashant Kishor
Vinesh Phogat : पंतप्रधान मोदींचा फोन आला होता, पण ‘त्या’ अटीमुळे बोलण्यास नकार दिला! विनेश फोगाटचा गौप्यस्फोट

दारूबंदी हटवणार

राज्यात सत्ता आल्यास बिहारमधील दारुबंदी हटवण्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली आहे. त्यातून मिळणारा पैसा शिक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जाईल. मागील 25 ते 30 वर्षे लोकांनी आरजेडी किंवा बीजेपीला मतदान केले. आता हा पर्याय कोणत्याही वारसाहक्काने आलेल्या पक्षाचा नाही. हा लोकांचा पक्ष आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

उमेदवारांची निवड लोकांमधून

विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाचा अध्यक्ष किंवा मी उमेदवार ठरवणार नाही. लोकांनीच त्यांच्यातील चांगल्या युवकाचे नाव पुढे करायचे आहे. निवडणूक लढण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसले तरी चालतील. त्यासाठी मी आहे. हेच पक्षाचे धोरण असेल, असेही प्रशांत किशोर यांनी जाहीर केले. तुम्हाला जसा उमेदवार निवडीचा अधिकार असेल तसा निवडून आलेल्या आमदाराला परत बोलावण्याचा अधिकारही देऊ, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com