Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आज फैसला; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटीसह आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत मोठा निर्णय

Government agrees in principle to three demands; talks on Dharmendra Pradhan resignation continue : सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना मदत, एफआयआर मागे घेणे आणि भविष्यात कारवाई न करण्याच्या मागण्यांना तत्त्वतः मान्यता दिल्याचा आंदोलनकर्त्यांचा दावा; दुपारी 3 वाजता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पुन्हा चर्चा होणार.
Dharmendra Pradhan Resignation
Dharmendra Pradhan ResignationSarkarnama
Published on
Updated on

Jantar Mantar Protest : जंतरमंतर येथे सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाबाबत सरकार आणि आंदोलनाच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीतील चर्चेनंतर काही मागण्यांवर सकारात्मक प्रगती झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, तीन प्रमुख मागण्यांना सरकारने तत्त्वतः मंजुरी दर्शवली असून, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आज (शनिवार) दुपारी तीन वाजता पुन्हा चर्चा होणार आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी व्यासपीठावरून सांगितले की, धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. "आजची चर्चा सकारात्मक झाली असून, प्रधान यांचा राजीनामा 'लोड' होतोय. तोपर्यंत सर्वांनी ठामपणे आंदोलन सुरू ठेवावे," असे आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केले.

आंदोलनकर्त्यांच्या मते, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत, आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेणे आणि आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीवर भविष्यात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, याबाबत सरकारकडून (Central Government) लेखी हमी देण्याची मागणी करण्यात आली होती. या तिन्ही मागण्यांना सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

Dharmendra Pradhan Resignation
BJP On Abhijeet Dipke : 'अभिजित दीपके भविष्यात भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक लढवतील'; निशिकांत दुबे यांचा दावा

दरम्यान, अभिजित दीपके यांनी, आंदोलनाचा पुढील टप्पा आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर केंद्रित राहील, असे स्पष्ट केले. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी देशातील 150 हून अधिक शहरांमध्ये आंदोलन झाल्याचा दावा करत नागरिकांना शांतता राखून अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

Dharmendra Pradhan Resignation
BJP MLA Security Guard Case: सरकारी रुग्णालयात परिचारिकेला दमदाटी; भाजप आमदाराच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा, सेवेतून हकालपट्टी

अटकेची शक्यता, तरी आंदोलन सुरूच राहणार

प्रवक्ते सौरभ दास यांनी 20 जुलै रोजी आंदोलकांवर झालेल्या कथित कारवाईचा उल्लेख करत त्या प्रकरणावर मौन बाळगले जाणार नसल्याचे सांगितले. दास आणि आशुतोष रांका यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मांडल्याची माहिती दिली. अटकेची शक्यता व्यक्त होत असली तरी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com