BJP MLA Security Guard Case: सरकारी रुग्णालयात परिचारिकेला दमदाटी; भाजप आमदाराच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा, सेवेतून हकालपट्टी

BJP MLA security guard booked for threatening nurse: परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर भाईंदर पोलिसांत गुन्हा दाखल; घटनेचा निषेध करत आमदार नरेंद्र मेहता यांनी संबंधित सुरक्षा रक्षकाला सेवेतून काढले.
Government hospital nurse threatened by security guard
Government hospital nurse threatened by security guardSarkarnama
Published on
Updated on

BJP MLA security guard removed from service: कल्याण-डोंबिवली महापालिकेतील डॉक्टरांवरील कथित मारहाणीच्या घटनेनंतर आता मिरा-भाईंदरमध्ये सरकारी रुग्णालयातील परिचारिकेला शिवीगाळ व दमदाटी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाविरोधात परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आमदार नरेंद्र मेहता यांनी संबंधित सुरक्षा रक्षकाची सेवेतून हकालपट्टी केल्याची माहिती दिली.

माहितीनुसार, भाजप (BJP) आमदार नरेंद्र मेहता यांचे खासगी सुरक्षा रक्षक अरविंद रंजीनी यांना श्वानदंश झाल्यानंतर उपचारासाठी पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात आणण्यात आले होते. उपचार प्रक्रियेनुसार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्यास सांगितले. यावरून वाद निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परिचारिका आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अरविंद रंजीनी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी (Worker) शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन केले.

Government hospital nurse threatened by security guard
Fake Drugs Case Threat : 'त्या पोलिसाचे फक्त निलंबित नको, थेट...'; फडणवीसांना ठाकरेंच्या शिलेदारानं करून दिली विधिमंडळातील घोषणेची आठवण

त्यानंतर सर्व कर्मचारी भाईंदर पोलिस ठाण्यात गेले आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला आहे.

Government hospital nurse threatened by security guard
PM Modi Fast Track Court : अडीच महिन्यानंतर नरेंद्र मोदी पेपरफुटीप्रकरणावर काय बोलले? संसदेत होणार मोठा निर्णय...

दरम्यान, या घटनेबाबत आमदार नरेंद्र मेहता यांनी सार्वजनिकरीत्या निषेध व्यक्त केला. डॉक्टर, परिचारिका आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे अयोग्य आणि निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित सुरक्षा रक्षक अरविंद रंजीनी यांची सेवेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com