Jantar Mantar Protes: "तरुणांसोबत सबुरीने घ्या अन् चर्चा करा" : GenZ ने दणका दिलेल्या देशाचा मोदी सरकारला सल्ला

NEET Paper Leak, Jantar Mantar Protest, Bangladesh Reaction: दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET कथित पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, बांगलादेशने चिंता व्यक्त केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि जलद न्यायालयाची नियुक्ती चर्चेत आहे.
Students protest at Jantar Mantar in New Delhi over the alleged NEET paper leak as Bangladesh expresses concern and calls for democratic resolution.
Students protest at Jantar Mantar in New Delhi over the alleged NEET paper leak as Bangladesh expresses concern and calls for democratic resolution.Sarkarnama
Published on
Updated on

NEET Paper Leak: दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे. भारताचा शेजारी देश बांगलादेशने या घडामोडींवर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आणि त्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

NEET पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी जंतर-मंतरवर आंदोलन करणारे विद्यार्थी तसेच विविध विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात आहे.

Students protest at Jantar Mantar in New Delhi over the alleged NEET paper leak as Bangladesh expresses concern and calls for democratic resolution.
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

याचबरोबर, या प्रकरणातील कथित गैरप्रकार आणि दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायव्यवस्थेनेही काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. पेपरफुटीशी संबंधित सर्व प्रकरणांची जलद आणि पारदर्शक सुनावणी व्हावी, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने विशेष जलदगती न्यायालयाची नियुक्ती केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बांगलादेश सरकारमधील मंत्री शमा उबैद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारत सरकारला उद्देशून म्हटले आहे की, भारतात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची माहिती त्यांना मिळाली आहे. लोकशाही देश आणि लोकशाही सरकार म्हणून आमची इच्छा आहे की, संपूर्ण प्रदेशात शांतता आणि स्थैर्य कायम राहावे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत आपल्या नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देईल आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती तातडीची पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे.

Students protest at Jantar Mantar in New Delhi over the alleged NEET paper leak as Bangladesh expresses concern and calls for democratic resolution.
NEET Paper Leak : भाजपला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा परवडणार नाही? मोदी-शहांच्या विश्वासामागची ५ मोठी कारणं

बांगलादेशला बसला होता GenZ आंदोलनाचा दणका :

जुलै २०२४ मध्ये बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांतील कोटा पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनावर तत्कालीन सरकारने हिंसक कारवाई केल्याचा आरोप झाला होता. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी राजधानी ढाका येथील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाकडे मोर्चा काढत शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. त्यानंतर डॉ. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार अस्तित्वात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com