NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपीला CBI ची क्लीनचीट! तपास एजन्सीनं नेमकं काय म्हटलंय?

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीप्रकरणी जबाबदारी स्विकारुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सध्या नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर जेन झी तरुणांचं जोरदार आंदोलन सुरु आहे.
CBI NEET Paper Leak
CBI NEET Paper Leak
Published on
Updated on

नवी दिल्ली : नीट पेपर फुटीप्रकरणी जबाबदारी स्विकारुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सध्या नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर जेन झी तरुणांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. त्यातच आता नीट प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. याप्रकरणातील प्रमुख आरोपीला सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे.

CBI NEET Paper Leak
CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनासाठी पुढील दोन दिवस महत्वाचे! NIA मार्फत चौकशी, 'रासुका'ची कारवाई अन्...; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

हे प्रकरण यंदाच्या NEET-UG 2026 पेपर लीकचं प्रकरण नाही. तर NEET-UG 2024 पेपर लीकचं आहे. या प्रकरणी चौकशी करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं (सीबीआय) मुख्य आरोपी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याला क्लीनचीट दिली आहे. सीबीआयनं गुरुवारी सांगितलं की, पेपर फोडणाऱ्या टोळीच्या या कथित म्होरक्या विरोधात NEET-UG 2024 पेपर चोरी करणं किंवा ते वाटण्याबाबत कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. या मुख्य आरोपीवर बिहार पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

CBI NEET Paper Leak
NSA: मोठी घडामोड! CJP आंदोलकांवर NSA अंतर्गत कारवाईची तयारी सुरु? दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण; दिपकेंची सडेतोड प्रतिक्रिया

सीबीआयनं नेमकं काय म्हटलं?

सीबीआयनं एका निवेदनात म्हटलं की, "बिहार पोलिसांनी २०२४ मध्ये NEET-UG प्रश्नपत्रिका चोरीची माहिती मिळाल्यानंतर इतर परीक्षांच्या पेपरलीक प्रकरणात सहभाग असल्याचं सांगत या व्यक्तीचं नाव एफआयआरमध्ये नोंदवलं होतं. पण नंतर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं. या संजीव कुमारची सीबीआयनं पुन्हा नव्यानं चौकशी केली. तसंच चोरीमध्ये सहभागी सर्व लोकांची, चोरण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचं वाटप आणि लाभार्थ्यांची ओळख पटवली होती.

CBI NEET Paper Leak
Dharmendra Pradhan: विद्यार्थीदशेत धर्मेंद्र प्रधानांनी पेपरलीकविरोधात केलं होतं आंदोलन, मारही खाल्ला होता; काय आहे हा किस्सा?

सीबीआयनं सांगितलं की, पटना येथील कोर्टात ४५ लोकांविरोधात आरोपपपत्र दाखल केलं. पण यांपैकी नीट पेपर लीकच्या कटात संजीव कुमारचा हात असल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. आधी आरोपी फरार होता, नंतर बिहार पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर सीबीआयनं चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं, पण त्याचा यात काही हात असल्याचं पुरावा मिळू शकला नाही. त्यामुळं संजीव कुमारला या प्रकरणात जामीन मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com