मुंबई: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या दाव्यामुळे रशिया-युक्रेन तणावामुळे जगाची चिंता वाढली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भविष्यात युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला असल्याची त्यांना खात्री असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. ( Jayant Patil Latest news)
दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशिया आणि युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेश परत आणण्यासंबंधी आवाहन केले आहे. 'मोदीजी विद्यार्थी हे आपले भवितव्य आहेत. त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा. असे विनंती करणारे ट्वीट मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून केले आहे.
रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशांमध्ये सुमारे १८ हजारपेक्षा जास्त भारतीय नागरिक अडकले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना मदत हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या आणि त्यांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करा, असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
युक्रेन आणि रशियांतील परिस्थिती धोकादायक दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. पूर्व युक्रेनमध्ये लष्कर आणि रशियन समर्थकांमध्ये गोळीबार सुरू आहे, तर युक्रेनच्या सीमेपासून फक्त 5 किमी अंतरावर 200 रशियन रणगाडे आणि रॉकेट लॉन्चर तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पूर्व युक्रेनच्या एका भागात मोठा स्फोट ऐकू आला. युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे.
युक्रेनच्या सीमेकडे रशियन सैन्याच्या रणगाड्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. दोन्ही बाजूंमधला तणाव वाढत असताना रशियन हल्ल्याचा धोका अधिक प्रबळ होऊ लागला आहे. तर बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोनेस्तक परिसरात 10 हून अधिक स्फोट ऐकू आले. दरम्यान, रशिया समर्थक बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे दोन सैनिक ठार झाले आहेत. डोनेस्तक परिसरात आतापर्यंत 591 युद्धविरामाचे उल्लंघन आणि 553 स्फोट झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.