
मुंबई: 'देशाच्या राजकारणात मोठे बदल घडत असून 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार. त्यानंतर देशाच्या राजकारणातून सोमय्यासारखे XXX लोक नाहीसे होतील," अशी टीपण्णी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर केली होती. या टीपण्णीला किरीट सोमय्यांनी, मी संजय राऊतांना (Sanjay Raut) सांगणार आहे की, एकदाच मला शिव्यांची डिक्शनरी देऊन टाका, उगाच माझ्या आईला सारखा सारखा संताप नको, अशा खोचक शब्दांत राऊतांवर पलटवार केला आहे. (Sanjay Raut Kirit Somaiya latest news)
किरीट सोमय्यां यांच्यासह त्यांच्या २५ सहकाऱ्यांवर सांताक्रुझ पोलिस ठाण्यात कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकऱणी पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर त्यांनी आज पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी करायला गेल्याने समन्स बजावल्याचा दावा त्यांनी केला आहे.
छगन भुजबळांवर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. ते न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर ती जप्त करण्यात आली आणि भुजबळांना दोन वर्षे जेलमध्ये काढावी लागली. याच बेनामी मालमत्तेची पाहणी करायला गेलो म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले, जर मी त्यांचे घोटाळे बाहेर काढले म्हणून माझ्यावर आणि माझ्या मुलाला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, असे असेल तर मी आणि माझा मुलगा १०० वेळा तुरुंगात जायला तयार आहोत. पण आम्ही यांचे घोटाळे बाहेर काढणारच असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. 'तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगी घेतली होती का, असा खोचक सवाल किरीट सोमय्यांनी विचारला. याबाबत पत्रकारांनी विचारले असता राऊतांनी सोमय्यांवर शेलक्या शब्दात टीका केली. देशाच्या राजकारणात मोठे बदल घडत आहेत. वर्ष 2024 नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येईल. त्यामुळे सोमय्यासारखी xxxलोक राजकारणातून संपतील. असे राऊतांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.