मुख्यमंत्रीपद भाजपला देवून नितीश कुमार राज्यसभेवर? JD(U) ने सांगितलं काय होणार...

JD(U) | BJP | Bihar Politics : नितीश कुमारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या गोटात वेगाने घडामोडी
Nitish Kumar and Narendra Modi
Nitish Kumar and Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे मागच्या काही दिवसांपासून राज्यसभेवर जाणार किंवा उपराष्ट्रपती होणार अशा चर्चा सुरु आहेत. या बाबतची इच्छा त्यांनी स्वतः व्यक्त केल्याने या चर्चांनी जोर धरला होता. मात्र या चर्चांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसुन त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण जनता दलचे (संयुक्त) महासचिव आणि बिहारचे जलसंपदा मंत्री संजय कुमार झा यांनी दिले आहे. याशिवाय नितीश कुमार आपल्या मुख्यमंत्रीपदाची संपूर्ण टर्म जनतेची सेवा करण्यासाठी देणार असल्याचेही त्यांनी ट्विट करुन स्पष्ट केले आहे.

संजय झा यांच्या या स्पष्टीकरणामुळे आता भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नितीश कुमार यांनी आपल्याला राज्यसभेत जायला आवडेल, असे म्हटल्यानंतर सहकारी पक्ष भाजपने त्यांची ही इच्छा पूर्ण करुन राज्यात आपला मुख्यमंत्री बसवतो येतो का याची चाचपणी सुरु केली असल्याचे पहायला मिळाले. याबाबत बोलताना भाजपचे दिग्गज नेते आणि आमदार हरि भूषण ठाकूर म्हणाले होते की, नितीश कुमार यांची राज्यसभेची इच्छा भाजप पूर्ण करेल, आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री बनेल तर जनता दलाचा उपमुख्यमंत्री बनेल.

Nitish Kumar and Narendra Modi
धनंजय महाडिकांची सारवासारव; वादग्रस्त वक्तव्यावर माफी अथवा दिलगीरी नाही

यासाठी नावांची देखील चर्चा सुरु झाली होती. यात मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांचे नाव आघाडीवर होते. तर दोन उपमुख्यमंत्री पदासाठी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंगेरचे खासदार ललन सिंह आणि बिहार सरकारमधील शिक्षण मंत्री विजय चौधरी, मंत्री श्रवण कुमार यांची नावं आघाडीवर होती. मात्र झा यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर ही सर्व नाव आता मागे पडली आहेत.

२०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपच्या (BJP) मदतीने नितीशकुमार मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. सध्या ते बिहार विधानसभेचे सदस्य आहेत. तर यापूर्वी ते लोकसभेचे खासदार आणि विधान परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे आता केवळ राज्यसभेचे सदस्य पद त्यांना मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी एका टप्प्यावर राज्यसभेचे सदस्य व्हायचे आहे, असं म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com