कोल्हापूर : भाजपचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापले आहे. त्यांच्या विरोधात गुरूवारी सर्वपक्षीय महिलांनी ताराराणी चौकात जोरदार आंदोलन केले. याशिवाय सोशल मिडीयावर देखील त्यांच्या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या वाढत्या टीकेनंतर महाडिक यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे म्हणतं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी या वक्तव्यावर माफी अथवा दिलगीरी व्यक्त केलेली नसल्याने त्यांच्याविरोधातील टीकेचा सुर अद्यापही कायम असल्याचा दिसून येत आहे. (Dhananjay Mahadik controversial statement News)
धनंजय महाडिक यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातुन आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध होणार अशी वल्गना करणाऱ्यांना भाजपने सडेतोड आव्हान दिले. भाजपला मिळणारा प्रतिसाद पाहून कॉंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्याची मोडतोड करून राजकीय षड्यंत्र रचले. भागीरथी संस्थेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत हजारो महिलांना न्याय दिला. महिलांचा सन्मान आणि आदर करण्याची महाडिक घराण्याची परंपरा आहे. स्वप्नातही आपल्याकडून कोणत्याही महिलेचा कधीच अवमान होणार नाही.
मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजकीय विद्वेषातून रचलेले हे एक कुभांड आहे. पालकमंत्र्यांचा तोल ढासळला असून, त्यांच्याकडून सत्तेचा आणि पदाचा दुरूपयोग होत आहे. महिलांचा सन्मान कसा राखावा, हे आम्हाला कुणी शिकवण्याची गरज नाही. निवडणुकीत प्रचारासाठी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते आपल्या वक्तव्याची मोडतोड करून, जनतेची दिशाभूल करत आहेत. मी केवळ दोन्ही उमेदवारांमध्ये तुलना करण्याच्या अनुषंगाने बोललो, त्यात कुठेही महिलांचा अपमान केलेला नाही, असेही धनंजय महाडिक यांनी म्हंटले आहे.
चित्रा वाघही भडकल्या :
भाजपच्या नेत्या यांनी धनंजय महाडिक यांना घरचा आहेर दिला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला. इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने शत्रू तुडवला. महिलांचा सन्मान व्हायलाचं हवा. कुणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्य करू नयेत, असं म्हणत वाघ यांनी महाडिकांवर शरसंधान साधले आहे.
महाडिक काय म्हणाले?
काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात तर तिला मतदान करा. मला सांगा तुमचा पती एखादं प्लंबिंग काम करत असेल तुम्हाला ते जमणार आहे का? तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.