Nitish Kumar News : नितीश कुमारांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; पाटण्यात जागोजागी झळकले बॅनर्स!

JDU leader Demand Bharat Ratna for Nitish Kumar : हे बॅनर जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस छोटू सिंह यांच्या मार्फत लावण्यात आलेले आहेत. यामुळे हे बॅनर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहेत.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

JDU Patna Meeting News : पाटण्यातील 'जनता दल यूनायटेड'च्या कार्यालयात आज(शनिवार) राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली गेली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री नितीशकुमार असणार आहेत. या बैठकीच्या आधी पाटण्यातील रस्त्यांवर लागलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण, या बॅनरवर नितीश कुमारांना भारतरत्न दिला जावा, अशी मागणी केली गेली आहे.

पाटणा शहरात जागोजागी लागलेल्या बॅनरवर 'मुख्यमंत्री नितीश कुमारांचा(NitishKumar) मोठा फोटो आहे. तसेच प्रख्यात समाजवादी बिहारचे विकासपुरूष माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न दिला जावा.' असा मजकूर आहे. हे बॅनर जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस छोटू सिंह यांच्या मार्फत लावण्यात आलेले आहेत. यामुळे हे बॅनर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहेत. हे बॅनर्स जेडीयूच्या राज्य कार्यकारिणीसाठी येणाऱ्यांच्या स्वागतासाठी लावल्या गेलेल्या बॅनर्सच्या शेजारी लावण्यात आले आहेत.

Nitish Kumar
Shyam Rajak : लालूंना झटका देत पुन्हा 'JDU'मध्ये आलेल्या श्याम रजक यांना नितीश कुमारांकडून मोठी जबाबदारी!

जेडीयूच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या(Vidhan sabha Election) तयारीच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. जेडीयू आगामी विधानसभा निवडणुकीत किमान 120 जागा लढवू इच्छित आहे. याबाबत या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तबही केला जाऊ शकतो. शिवाय, पक्षनेते आणि पदाधिकारी,कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीच्यादृष्टीने कामकाजाची रुपरेषाही आखली जाईल, असं बोललं जात आहे.

याआधी जून महिन्याच जेडीयू(JDU) सुप्रीमो नितीश कुमार यांचे बॅनर्स पाटण्यातील रस्त्यांवर लावले गेले होते, तेव्हा त्यावर नितीश कुमार यांच्या फोटोंसह टायगर जिंदा है असं लिहिले गेले होते. एवढंच नाहीतर पक्षातील नेत्याचं असंही म्हणणं होतं की, नितीश कुमारांच्या प्रभावामुळेच एनडीए लोकसभा निवडणुकीत एवढं यश मिळवू शकली. एनडीएच्या दोन्ही सहकाऱ्यांनी भाजप आणि जदयूने बिहारमध्ये १२-१२ जागा मिळवल्या होत्या.

Nitish Kumar
Rahul Gandhi : मतदानाआधीच काँग्रेसने हरियाणा जिंकला? राहुल गांधींनी सांगितली विजयाची सहा कारणे

जानेवारी महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न जाहीर केला. हा पुरस्कार त्यांच्या मृत्यूच्या 35 वर्षांनंतर दिला गेला होता. जेडीयू आणि आरजेडीसह बिहरमधील सर्वच राजकीय पक्षांची प्रदीर्घ काळापासून ही मागणी होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com