Rahul Gandhi : मतदानाआधीच काँग्रेसने हरियाणा जिंकला? राहुल गांधींनी सांगितली विजयाची सहा कारणे

Rahul Gandhi haryana assembly election 2024 : राहुल गांधी म्हणाले, हरियाणा निवडणुकीत काँग्रेस जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तयारीनिशी एकजुटीने रिंगणात उतरली आहे. आमचे प्राधान्य विकासित हरियाणासाठी आहे.
Rahul Gadhi
Rahul GadhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : हरियाणा विधासभा निवडणुकीसाठी आज (शनिवारी) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. मात्र, मतदानाच्याआधीच राहुल गांधी यांनी आपल्या व्हाॅट्सअप चॅनेलवर पोस्ट टाकत 8 ऑक्टोबरला हमीभावासह हरियाणात काँग्रेसचे सरकार येत असल्याचा दावा केला आहे.

विजयाचा दावा करताना काँग्रेस हरियाणामध्ये का जिंकत आहे याची सहा कारणे देखील राहुल गांधी यांनी सांगितली आहेत. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसची एकजुट आणि स्पष्ट रणनिती हे काँग्रेस जिंकणार असल्याचे मुख्य कारण आहे.

काँग्रेसची एकजूट आणि स्पष्ट रणनीती याशिवाय शेतकऱ्यांच्या विश्वास, बेरोजगारी, महिला सुरक्षा, दलित मतदारांचा विश्वास आणि परिवार ओळख पत्रामुळे त्रस्त नागरिक या सहा कारणांमुळे काँग्रेसची हरियाणामध्ये सत्ता येत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, हरियाणा निवडणुकीत काँग्रेस जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तयारीनिशी एकजुटीने रिंगणात उतरली आहे. आमचे प्राधान्य विकासित हरियाणासाठी आहे. ज्यासाठी आम्ही एक लोकप्रिय जाहीरनामा तयार केला आहे आणि प्रत्येक विभागाच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याची आम्ही हमी दिली आहे.

Rahul Gadhi
Tirupati Laddu Case : तिरुपती लाडू प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा चंद्राबाबूंना झटका; CBI ची एन्ट्री होणार

शेतकऱ्यांचा काँग्रेसवर विश्वास आहे. तीन शेतीविषयक कायदे आणि एमएसपीची हमी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भाजपविषयी नाराजी आहे. शेतकऱ्यांविषयी आम्ही संवेदनशील आहोत. एमएसपीच्या कायदेशीर हमीचे आम्ही आश्वासन दिले आहे, असे देखील राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

दलित मतदारांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत राज्यघटनेचे संरक्षण, जातीय जनगणना आणि लोकसंख्यानिहाय वाटणी याद्वारे सर्वांना न्याय देण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे. त्यामुळे हरियाणातील दलितांचा मोठा वर्ग काँग्रेससोबत उभा आहे, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. तसेच हरियाणाच्या परिवार ओळख पत्राने (PPP) सुमारे 10 लाख कुटुंबांना बीपीएल यादीतून काढून टाकले आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या योजना या गरिब कुटुंबांना मिळत नाही. ही ओळखपत्रे रद्द करण्याचे काँग्रेसने आश्वासन दिले आहे. त्यामुळे काँग्रेसला गरिब कुटुंबांचा पाठींबा आहे, असे देखील राहुल गांधी यांनी आपला सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rahul Gadhi
Murder Case : धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाची मध्यरात्री हत्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com