नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात ६० जागांवर (UP Election)शिवसेनेने (Shivsena)आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली होती. मात्र अर्ज आल्यानंतर 19 उमेदवारांची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून नाकारण्यात आली. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे यांनी प्रचार केला होता. मात्र उत्तर प्रदेशात शिवसेनेला मोठी हार पत्करावी लागली.
गोरखपूरमध्ये शिवसेने उमेदवारासाठी खासदार संजय राऊत आणि पर्यटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रचार केला होता. याठिकाणी शिवसेना नेते राजू श्रीवास्तव हे उमेदवार होते. ''यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री म्हणून राजू श्रीवास्तव येईल,'' असं संजय राऊत म्हणाले होते.
राजू श्रीवास्तव यांनी डोमरियागंज मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र यात त्यांना फार यश मिळवता आलेलं नाही. राजू श्रीवास्तव पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांना 1 हजार 454 मतं मिळाली. श्रीवास्तव यांनी काँग्रेस उमेदवारापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. काँग्रेसचे उमेदवार कांती यांना हजार मतंही मिळालेली नाहीत.
''जेव्हा स्टेजवर आलो तेव्हा मला मुंबईतच सभा घेतोय असं वाटलं. राजू श्रीवास्तव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, हा धनुष्यबाण घेऊन तुम्ही विधानसभेत जाल आणि शिवसेनेचे पहिले मंत्री देखील व्हाल,'' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने कंबर कसली होती. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे नेते-खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रचारासाठी उत्तरप्रदेश मोहिमेवर गेले होते. गोरखपूरमध्ये शिवसेना उमेदवार राजू श्रीवास्तव यांच्या प्रचारसभेत राऊतांनी भाजपवर (BJP)जोरदार हल्लाबोल केला होता. ''यंदाच्या निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री होईल,'' असा दावा त्यांनी केला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यावर राजकीय चर्चांना मात्र उधाण आले होते. मात्र राजू श्रीवास्तव हे पराभूत झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.