
Jharkhand News : झारखंडचे नवे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच पदभार स्वीकारला आहे. सूत्रे हाती घेताच हेमंत सोरेन यांनी पहिला निर्णय घेऊन झारखंडच्या महिलांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका एकत्रच पार पडल्या, निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा झाला पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. यावर शिक्कामोर्तब अजूनही झाला नाही.
झारखंड असो की महाराष्ट्र लाडक्या बहिणींना दिली जाणारी ओवाळणी हिट ठरली. त्यामुळे सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. मंईयां सन्मान योजनेचे मानधन 2500 रुपये करण्यात येणार आहे. डिसेंबरपासून महिलांच्या बँक खात्यात दरमहा 2500 रुपये जमा होतील. अशी घोषणा त्यांनी आज केली आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेतृत्वाखालील सरकारने या विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑगस्ट महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यातील 50 लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही योजना या निवडणुकीत भारत आघाडीच्या विजयाचे कारण ठरली आहे.
📌 मंईयां सन्मान योजनेचे मानधन 2500 रुपये करण्यात येणार आहे.
📌राज्यात JPSC/JSSC अंतर्गत भरती प्रक्रिया जलद केली जाईल.
📌 केंद्र सरकारकडून राज्याची 1 लाख 36 हजार कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाई केली जाईल.
📌 राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकार अनेक स्त्रोतांवर काम करेल.
📌 आसाममध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या झारखंडमधील आदिवासी आणि मूळ रहिवाशांच्या परिस्थितीची माहिती सर्व पक्ष आणि अधिकाऱ्यांच्या टीमकडून घेतली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.