Jharkhand ED Raid: मंत्र्यांच्या सचिवाच्या नोकरावर EDचा छापा; घरात आढळले कोट्यवधीचं घबाड

Jharkhand Minister Alamgir Alam News: 20 ते 30 कोटीं रुपयांची ही रक्कम असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रक्कम मोजण्यासाठी नोटा मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशिन मागविण्यात येत आहेत.
Jharkhand ED Raid
Jharkhand ED RaidSarkarnama
Published on
Updated on

Jharkhand News: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) झारखंडमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरात कोट्यवधींची घबाड हाती लागलं आहे.

सुमारे 20 ते 30 कोटी रुपयांची ही रक्कम असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रक्कम मोजण्यासाठी नोटा मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशिन मागविण्यात येत आहेत. हा काळा पैसा असल्याचा ईडीला संशय आहे.

फेब्रुवारी 2023मध्ये ईडीने झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के. राम यांना काही योजनांच्या अंमलबजावणीतील गैरव्यवहार केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

दहा हजार रुपयांच्या लाच प्रकरणात ईडीचे पथक तपास करीत असताना त्यांच्या हाती महत्वाचे पुरावे हाती लागले. त्यांचे धागेदोरे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांच्यापर्यंत पोहचले. त्यांच्या विभागातील भष्ट्राचाराची माहिती ईडीच्या हाती लागली.

हा काळा पैसा मंत्र्यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यांनी छापा टाकला असता त्यांच्या हाती कोट्यवधीचं घबाड लागलं. ही रक्कम पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

Jharkhand ED Raid
Solapur Lok Sabha 2024: मतदानासाठी सोलापूर प्रशासन सज्ज; मोहोळमध्ये सव्वातीन लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

झारखंडमध्ये काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार करीत असताना त्यांनी भष्ट्राचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. मोदींच्या सभेनंतर काही दिवसातच ही कारवाई करण्यात आली आहे. यावर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.संपूर्ण झारखंड सरकार भ्रष्टाचारात अडकला आहे. मतमोजणीनंतर हा आकडा ५० कोटींच्या वर जाईल, अशी शक्यता निशिकांत दुबे यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैशा जप्त करण्यात आला होता. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि उद्योगपती धीरज साहू यांच्या घरातून साडेतीनशे कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com