Nishikant Dubey : होशियार, कल्पना भाभी आ गई है! भाजप खासदाराने मुख्यमंत्र्यांना केलं सतर्क

Jharkhnad Politics Nishikant Dubey Champai Soren Kalpana Soren : कल्पना सोरेन या गांडेय विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत.
Champai Soren, Kalpana Soren, Nishikant Dubey
Champai Soren, Kalpana Soren, Nishikant DubeySarkarnama

Jharkhand Political News : झारखंडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी तसेच संकेत दिले आहेत. पुढील सात दिवस राज्यातील सरकारसाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुबे यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी शनिवारी ही पोस्ट केली असून त्यामध्ये थेट मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना अलर्ट केले. त्यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते, असे संकेत त्यांनी आपल्या पोस्टमधून दिले आहेत.

दुबे यांनी म्हटले आहे की, ‘चम्पई दा होशियार, कल्पना भाभी आल्या आहेत. झारखंडच्या विद्यमान सरकारसाठी पुढील सात दिवस खूप महत्वाचे असणार आहेत.’ दुबे यांनी कल्पना सोरेन यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून चंपई सरकारवर निशाणा साधला आहे.

कल्पना सोरेन या माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी आहेत. झारखडंमधील गांडेय विधानसभा मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे चंपई सोरेन यांच्याऐवजी कल्पना सोरेन मुख्यमंत्रिपद होऊ शकतात, अशी चर्चा राज्यात रंगली आहे.

हेमंत सोरेन यांना लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच ईडीने अटक केली आहे. भूखंड घोटाळाप्रकरणी त्यांच्या आरोप करण्यात आले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर चंपई सोरेन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यावेळीच कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशी चर्चा होती.

Champai Soren, Kalpana Soren, Nishikant Dubey
Maharashtra Sadan Ayodhya : मुख्यमंत्री शिंदेंचे स्वप्न होणार साकार; अयोध्येतील महाराष्ट्र सदन शरयू नदी किनारी उभारलं जाणार!

दरम्यान, विद्यमान झारखंड सरकारचा चार वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तर गांडेय मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिलेल्या सरफराज अहमद यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीआधी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करून त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत झारखंड मुक्ती मोर्चामध्ये चर्चा सुरू असल्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com