Bjp News: '' आता हरायचंच न्हाय!''; भाजपच्या जेपी नड्डांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले

JP Nadda : विधानसभा आणि २०२४ मधील लोकसभा यापैकी एकाही निवडणुकीत भाजपचा पराभव होता कामा नये.
J. P. Nadda
J. P. NaddaSarkarnama

Bjp's JP Nadda News : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन आज दिल्लीत झाले.पंतप्रधान नरेंंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह भाजपचे ३०० हून जास्त प्रतिनिधी देशभरातून उपस्थित आहेत. आर्थिक, राजकीय व जागतिक पातळीवरील भारताचे महत्वाचे स्थान या ३ विषयांवरील ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.पंतप्रधानांच्या भाषणानंतर उद्या (ता.१७) कार्यकारिणीचा समारोप होणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटनानंतर बैठकीला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी यंदाच्या वर्षी ९ राज्यांत होणाऱया विधानसभा आणि २०२४ मधील लोकसभा यापैकी एकाही निवडणुकीत भाजपचा पराभव होता कामा नये. त्यासाठी कंबर कसून कामाला लागावे अशा शब्दांत नड्डांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी सोमवारी( दि.१६) फुंकले आहे.

J. P. Nadda
Kokan News: भाजपचा डाव केसरकरांनी उधळून लावला; 'या' ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा रोवला

नड्डा म्हणाले, भाजपला यापुढे कोणताही पराभव स्वीकारार्ह नाही असे स्पष्टपणे सांगितले. आपल्याला यावर्षी व पुढच्या वर्षी होणारी एकही निवडणूक हरायची नाही. जिथे भाजपचे सरकार आहे तिथे संघटन अधिक मजबूत केले पाहिजे आणि सरकार नाही तेथे पक्षसंघटनेला आणखी ‘धार' दिली पाहिजे असेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या बूथ जिंका, या धोरणानुसार देशातील ७२ हजार बूथ भाजपसाठी असुरक्षित असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षआत आज तब्बल १ लाख ३० हजार बूथपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी आपली संपर्कसूत्रे प्रस्थापित केली आहेत.

J. P. Nadda
Balasaheb Thorat News : पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे बाळासाहेब थोरातच नाराज?

गुजरातच्या एतिहासिक विजयात पक्षसंघटना-कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. पण ‘स्वतः नेतृत्व करणे‘ हा वस्तुपाठ मोदींनी भाजप कार्यकर्त्यांसमोर ठेवला आहे. हिमाचल निवडणुकीत आम्हाला हिमाचलमधील ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा- प्रथा बदलायची होती. ती आम्ही बदलू शकलो नाही.

मात्र, यापूर्वी कोणताही पक्ष पाच टक्क्यांनी निवडणूक हरायचा, यावेळी ते प्रमाण केवळ एका टरक्क्यावर आले आहे. भाजप व कॉंग्रेस यांच्यातील मतांचा फरक फक्त ३७ हजार इतका कमी आहे. या पराभवातून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचेही नड्डांनी सूचकपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com