Balasaheb Thorat News : पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे बाळासाहेब थोरातच नाराज?

Balasaheb Thorat News : सत्यजीत तांबे यांच्या प्रकरणामध्ये बाळासाहेब थोरात यांनी अजून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat NewsSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat News : नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या सर्व घडामोडी थोरात आणि तांबे कुटुंबा भोवती फिरत आहेत. काँग्रेसने (Congress) उमेदवारी जाहीर केलेले असताना सुद्धा डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर त्याचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची चुप्पी आहे. मात्र, आता ते पक्षाच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा आहे.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. सध्या सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेवर ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, थोरातच नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामध्ये हंडोरे यांना अनेक काँग्रेस आमदारांनी मतदान केले नव्हते. मात्र, त्यावेळी आमदारांवर कोणतीच कारवाई झाली नाही.

Balasaheb Thorat News
Nana Patole News : सत्यजीत तांबेंची खेळी फसली? काँग्रेसने नाशिक पदवीधरसाठी जाहीर केला उमेदवार

त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासमत प्रस्तावावेळी अनेक आमदार गैरहजर होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली होती. मात्र, त्यावेळी विधिमंडळाचे नेते म्हणून थोरात यांनी मवाळ भूमिका घेतली होती. त्यावेळी पक्षाने या आमदारांवर कोणतीच कारवाई केली नाही. मात्र, यावेळी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे थोरात नाराज असल्याची चर्चा आहे.

तांबे यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता सत्यजीत तांबे यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कारवाई संदर्भात पक्षाने थोरात यांना विचारात घेतले नसल्याचेही बोलले जात आहे. सत्यजीत तांबे हे थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे हे घरातले प्रकरण होते ते हाताळता आले असते पण पक्षाने थेट कारवाई केल्यामुळे थोरात यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

Balasaheb Thorat News
Pimpri-Chinchwad News : 'अजितदादांसह अनेकांनी माझा 'कार्यक्रम' केला, राष्ट्रवादीच्याच नेत्याची खंत

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बाळासाहे थोरात यांना काहीतरी वेगळे घडत आहे. तुम्ही लक्ष द्या, असे सांगितले होते, असे पवार यांनीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. तसेच भाजप नेते व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही थोरात यांच्यावर निशाणा साधला. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला त्याला थोरात यांची समंती आहे का? असा सवाल त्यांनी केला. त्यावरही थोरात यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तर आपली भूमिकाही स्पष्ट केली नाही. त्यामुळे नाशिकमध्ये नेमके काय होणार असा प्रश्नच आहे. यामुळे थोरात यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com