Modi Government : आता निवडणूक लढणार नाही! पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांनी वर्षभरातच केली धक्कादायक घोषणा

Jual Oram Announces Retirement from Electoral Politics : केंद्रीय जनजातीय कार्य मंत्री जुएल ओराम यांनी ही घोषणा करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. केंद्रीय मंत्रिपदावर कार्यरत असताना त्यांनी हे जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Impact on Modi Cabinet and BJP’s Strategy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात येण्यासाठी अनेक खासदारांची चढाओढ असते. काहींना संधी मिळते तर काहींचा भ्रमनिरास होतो. पण केंद्रीय मंत्री झालेल्या एका नेत्यानं वर्षभरातच एक धक्कादायक घोषणा केली आहे. सक्रीय राजकारणातून संन्यास घेत असल्याचे सांगत या मंत्र्यांनी पुन्हा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय जनजातीय कार्य मंत्री जुएल ओराम यांनी ही घोषणा करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. केंद्रीय मंत्रिपदावर कार्यरत असताना त्यांनी हे जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओराम हे ओडिशातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. या राज्यांत भाजपने इतिहास घडवत पहिल्यांदाच सत्ता खेचून आणली आहे.

संभलपूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ओराम यांनी शनिवारी आपल्या राजकीय वाटचालीबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, आता मी निवडणूक लढणार नाही. मी आठवेळा लोकसभा आणि दोनदा विधानसभेची निवडणूक लढली आहे. आता पक्षासाठी काम करण्याची आणि युवकांना पुढे आणण्याची माझी इच्छा आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडीन, असेही ओराम यांनी स्पष्ट केले आहे.

Narendra Modi, Amit Shah
Sanjay Gaikwad Case : आमदार गायकवाड जे बोलले तेच घडलं, फोर्स कमी पडला अन् पोलिसांकडून मोहिम फत्ते!

मीडियाशी बोलतानाही ओराम यांनी निवडणूक न लढण्याबाबत स्पष्ट संकेत दिले. आता युवकांना पुढे येताना पाहू इच्छित असल्याचे ते म्हणाले. राज्यसभा सदस्य किंवा राज्यपाल बनण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, असे नाही झाले तरी मी संघटनेसाठी काम करत राहीन.

Narendra Modi, Amit Shah
PM of India : मोदी निवृत्त झाल्यास त्यांच्याजागी कोण? सर्व्हेमध्ये या ‘टॉप थ्री’ नेत्यांचा बोलबाला, पण एक नेता देऊ शकतो धक्का...

कोण आहेत ओराम?

ओराम हे भाजपचे ओडिशातील ज्येष्ठ नेते असून प्रमुख आदिवासी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते सुंदरगढ लोकसभा मतदारसंघाचे 1998 पासून नेतृत्व करत आहेत. 1999 मध्ये जनजातीय कार्य मंत्री म्हणून त्यांचा पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला होता. त्यानंतर 2024 मध्ये एनडीएची सलग तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com