Chief Justice of India : माझ्याप्रमाणेच ते संघर्ष पाहिलेल्या समाजातील..! CJI गवईंनी केली नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस

Justice Gavai Recommends Justice Surya Kant as Successor : सरन्यायाधीश या पदासाठी पात्र असलेल्या सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमुर्तींची शिफारस विद्यमान सरन्यायाधीशांकडून पंरपरेनुसार केली जाते.
CJI Bhushan Gavai
CJI Bhushan Gavai Sarkarnama
Published on
Updated on

Who is Justice Surya Kant? Profile of the Next CJI : भारताचे नवे सरन्यायाधीश कोण असणार, यावर सोमवारी अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले. केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने सरन्यायाधीश भूषण गवई यांना याबाबत पत्र लिहून त्यांचे उत्तराधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार सरन्यायाधीश गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस मंत्रालयाकडे केली आहे.

सरन्यायाधीश गवई हे 23 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यानंतर 24 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे सरन्यायाधीश बनतील. परंपरेनुसार विधी व न्याय मंत्रालयाकडून सरन्यायाधीशांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या एक महिने आधीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची शिफारस करण्याबाबत विनंती केली जाते. त्यानंतर विद्यमान सीजेआय औपचारिकपणे हे पद सोडण्याच्या जवळपास 30 दिवस आधी शिफारस करतात.

सरन्यायाधीश या पदासाठी पात्र असलेल्या सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमुर्तींची शिफारस विद्यमान सरन्यायाधीशांकडून पंरपरेनुसार केली जाते. सध्या सुप्रीम कोर्टात न्यायमुर्ती सूर्यांत हे सर्वात ज्येष्ठ न्यायमुर्ती आहेत. त्यांनी 24 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर जवळपास 14 महिने ते या पदावर असतील. ते ता. 9 फेब्रुवारी 2027 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

CJI Bhushan Gavai
Jain Boarding controversy update : मैत्री असावी तर गोखले अन् मोहोळ यांच्यासारखी..! जैन मुनींकडून कौतुक, आता अजितदादांवर नाराजी

सीजेआय गवई यांनी यांनी शिफारस करताना न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सर्वप्रकारे सक्षम असल्याचे म्हटले आहे. दोघांची सामाजिक पार्श्वभूमी समान आहे. दृढता आणि संघर्षाने परिपूर्ण अशी आहे. न्यायमूर्ती सूर्य़कांत हे माझ्याप्रमाणेच जीवनात प्रत्येक स्तरावर संघर्ष पाहिलेल्या समाजातील आहेत. आपल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना न्यायव्यवस्थेची आवश्यकता आहे. त्यामुळे या लोकांचे दु:ख आणि यातना समजून घेण्यासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत उपयुक्त असतील, असे सरन्यायाधीश म्हणाले होते.

CJI Bhushan Gavai
Election Commission : निवडणूक आयोग आज सर्वात मोठी घोषणा करणार; महाराष्ट्राबाबत महत्वाची अपडेट

कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत?

हरियाणातील हिसार येथे जन्म झालेले न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश असतील. रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून 1984 मध्ये विधी शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर हिसारमधील जिल्हा न्यायालयात त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात त्यांनी प्रॅक्टिस केली. वर्ष 2000 मध्ये ते हरियाणाचे सर्वात तरूण महाधिवक्त बनले. त्यानंतर चार वर्षांतच त्यांची हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. तर 2019 पासून ते सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com