Jyotiraditya Scindia : ज्योतिरादित्य शिंदे होणार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, काय आहे कारण ?

Political News : मुख्यमंत्री पदासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, सुमेर सिंह सोळंकी यांची नावे चर्चेत आहेत.
 Jyotiraditya Scindia : BJP
Jyotiraditya Scindia : BJPSarkarnama
Published on
Updated on

MP Vidhansabha Election : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला या वेळी बंपर जनादेश मिळाला आहे. काँग्रेसचा पराभव करीत भाजपने बहुमत प्राप्त केल्याने त्यामुळे सध्या मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर भाजप हायकमांडमध्ये खलबत्त सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात यावरून सट्टेबाजी व मोठ्या प्रमाणात शर्यती लागल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी सध्या पक्षाकडून निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे एक दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्री पदासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivarjsinh chouhan), केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्य सभेचे खासदार सुमेर सिंह सोळंकी यांची नावे चर्चेत आहेत.

सध्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक जैन साधू सिंधिया यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची भविष्यवाणी करताना दिसत आहेत. आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे येत्या काळात ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार का याची जोरदार चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयांमध्ये ज्योतिरादित्यची गणना

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांची गणना पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयांमध्ये केली जाते. राज्यातील अनेक महत्त्वाच्या कामांची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या खांद्यावर आहे. त्याच वेळी, ते मध्य प्रदेशातील भाजपचे एकमेव नेते आहेत, ज्यांच्या घरी राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी भेट दिली आहे. गेल्या एक वर्षात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जय विलास पॅलेसमध्ये शिंदे यांच्या राजवाड्याला भेट दिली आहे.

शिंदे आहेत गुजरातचे जावई

एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा उल्लेख गुजरातचे जावई असा केला होता. शिंदे यांच्या भाजप प्रवेशासाठी गायकवाड राजघराण्यानेही कंबर कसली होती. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे सासरचे घर गायकवाड राजघराण्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गायकवाड कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या दृष्टीने ही पण जमेची बाजू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये जैन साधू विहर्ष सागर एका धार्मिक मेळाव्यात प्रवचन देताना दिसत आहेत. येथे उपस्थित असलेले आमचे ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. शिंदे यांना संबोधित करताना मुनी म्हणतात की, त्यांना खासदाराबद्दल खूप आपुलकी आहे. खासदाराची सेवा करण्यासाठी सदैव ते प्रयत्नशील असतात. गेल्या वर्षी मुनी विहर्ष सागर महाराज ग्वाल्हेरला आले होते, त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचे जाणकारांचे मत आहे. आता मध्य प्रदेशात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना हा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याने त्यांच्या नावाची जोरात चर्चा रंगली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

 Jyotiraditya Scindia : BJP
ज्योतिरादित्य सिंधिया नागपुरात, घेतले स्मृती मंदिराचे दर्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com