Kangana Ranaut : ...म्हणून कंगना रनौतच्या 'Emergency'ची 'रिलीज डेट' ढकलली पुढे !

Kangana Ranaut Movie Emergency : आता 'इमरजन्सी' चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही, त्यामुळे कंगना चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

Kangana Ranaut Emergency Movie Release Date : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचा चित्रपट 'इमरजन्सी' बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता 'इमरजन्सी' चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. कंगना रनौतच्या चाहत्यांना आता या चित्रपटासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रिपोर्ट्स नुसार, कंगनाच्या (Kangana Ranaut) टीम मधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचं आज तकने म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, इमरजन्सी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

तर कंगना रनौतला अपेक्षा आहे की, चित्रपट प्रदर्शनासाठी नवीन तारीख लवकरच मिळेल. ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार होता, ती तारीक तर लॉक झाली आहे आणि यामागे सेन्सॉरची परवानगी नसल्याचा मुद्दा आहे. एवढच नाहीतर कंगना रनौतला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत.

Kangana Ranaut
Rahul Gandhi Vs Kangana Ranaut : राहुल गांधी खतरनाक, विध्वंसक, कलंक..! खासदार कंगना एवढ्या का भडकल्या?

इंडिया टुडेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोणते सर्टिफिकेशनही चित्रपटास मिळालेले नाही. यामुळे कंगना रनौतने मागील 31 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी आपले म्हणणे म्हटले होते. चित्रपट निर्मात्यांना ऑनलाइन स्तरावर या सर्टिफिकेशनमुळे आतापर्यंत अडचण निर्माण झाली नव्हती. यामुळे निर्माता आणि सेन्सॉर यांच्यात मतमतांतरे दिसत आहेत.

Kangana Ranaut
Rohit Pawar : कंगना रनौतच्या वक्तव्यावर संजय राऊत, रोहित पवार भडकले, भाजपने तर पत्रक काढले

कंगना रनौतने आपल्या इमरजन्सी चित्रपटाच्या प्रमोशनात कोणतीही कमतरा ठेवली नाही. त्या सर्व मीडिया हाउसेसमध्ये जाऊन मुलाखती देत आहेत आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसत आहेत. परंतु जसजशी चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ येत होती, कंगना रनौतसमोर अडचणी निर्माण होत आहेत.

शिरोमणी अकाली दलाच्या(Shiromani Akali Dal) दिल्लीतील संघटनेने चित्रपटास विरोध दर्शवला आहे. दिल्ली अध्यक्षांनी चित्रपटावरून सेन्सॉर आणि कंगना रनौतच्या प्रॉडक्शन हाउसला नोटीस पाठवली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com