Kangana Ranaut : कंगना रनौतच्या कानशिलात मारण्याची शिक्षा काय?

Kangana Ranaut Slapped : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर महिला CISF जवानाने कानशिलात मारली. ती चंदीगड हून दिल्लीला येत असताना ही घटना घडली.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर महिला CISF जवानाने  कानशिलात मारली. ती चंदीगड हून दिल्लीला येत असताना ही घटना घडली. फ्लाइट पकडण्यापूर्वी विमानतळावर चेकिंग करत असताना सीआयएसएफ महिला जवान कुलविंदर कौर यांनी त्यांना कानशिलात मारली.

या घटनेनंतर महिला शिपायाला ताब्यात घेण्यात आले. महिला शिपायाची चौकशी करण्यात येत असून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.अशा परिस्थितीत कानशिलात मारण्याची शिक्षा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सशस्त्र दलात असल्यामुळे महिला सैनिकाला कोणती शिक्षा होऊ शकते, यासाठी तुरुंग आणि दंड दोन्ही लागू होतील का? यावर कायदा काय म्हणतो याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.  

कायदा तज्ञांच्या म्हणण्या नुसार, कानशिलात मारल्यास आयपीसीची वेगवेगळी कलमे लावली जाऊ शकतात. हे कानशिलात कोणत्या परिस्थितीत दिली यावर अवलंबून असते.  कानशिलात मारणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. यासाठी आयपीसी कलम ३२३ अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई केली जाऊ शकते. कलम 323 म्हणते, जर कोणी जाणूनबुजून एखाद्याला इजा तर त्याला एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो तसेच एक हजार रुपये दंड किंवा तुरुंगवास आणि दंड दोन्ही होऊ शकतात.

तसेच जर त्या व्यक्तीने गैरवर्तन केले आहे आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीने कानशिलात मारली असेल तर या प्रकरणात शिक्षा बदलली जाऊ शकते आणि केस देखील डिसमिस होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला धमकावण्यासाठी गुन्हेगारी किंवा प्रतिकात्मक हल्ला केला आणि त्याला कोणतीही हानी झाली नाही परंतु पीडित व्यक्ती त्याच्या कुटुंबातील सदस्य असेल तर कलम 358 अंतर्गत आरोपी दोषी मानला जाईल.

CISF महिला जवानाला किती शिक्षा होणार?

कायदा तज्ञांनुसार या प्रकरणात महिला शिपायाकडे काही शस्त्र होते का, हाही तपासाचा विषय होऊ शकतो. किंवा कानशिलात मारल्यानंतर भाजप खासदाराचे आणखी नुकसान करण्याचा हेतू होता.  ही घटना घडली त्यावेळी काय परिस्थिती होती, महिला जवानाने अचानक हे कृत्य केले की त्यामागे दुसरे काही कारण होते की केवळ शेतकरी प्रश्नापुरतेच कारण मर्यादित होते, हे तपासा नंतर समोर येईल मात्र साध्य परस्थितीत आयपीसी कलम ३२३ अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई केली जाऊ शकते. कलम 323 म्हणते, जर कोणी जाणूनबुजून एखाद्याला इजा किंवा फसवणूक केली तर त्याला एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. एक हजार रुपये दंड किंवा तुरुंगवास आणि दंड दोन्ही होऊ शकतात.

Kangana Ranaut
Ajit Pawar : भाजपचा खडकवासला दादांचा झालाच नाही ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com