Kapil Sibal : मोदींकडून पुरावे मागणार का ? ; निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल भडकले ; BJP भष्ट्राचाराचे 'रेट कार्ड..

kapil sibal target election commission : सांयकाळपर्यंत हे पुरावे सादर करावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने काँग्रेस केली आहे.
kapil sibal target election commission
kapil sibal target election commission Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Election 2023 kapil sibal target election commission : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. उद्या (सोमवार ) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. (kapil sibal target election commission tweet ec dare to ask proof from pm modi)

वृत्तपत्रात जाहिरात देऊन काँग्रेसने भाजपच्या भष्ट्राचाराबाबतचे 'रेट कार्ड' छापले आहे. या 'रेट कार्ड'च्या माध्यमातून काँग्रेसने भाजपचा भष्ट्राचार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

या 'रेट कार्ड'वरुन भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावरुन निवडणूक आयोगाने काँग्रेसला नोटिस बजावली आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपांचे त्यांच्याकडून पुरावे मागितले आहे. आज (रविवार) सांयकाळपर्यंत हे पुरावे सादर करावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने काँग्रेस केली आहे.

kapil sibal target election commission
Karnataka Election 2023 : मतदानापूर्वीचं काँग्रेसनं मारलं मैदान ; काँग्रेसला 'अच्छे दिन', कर्नाटकातील मोठी वोट बँक...

निवडणूक आयाोगाच्या या नोटिशीवरुन राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी आयोगावर जोरदार हल्लाबोल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी जे आरोप करतात, त्याचे पुरावे निवडणूक आयोग मागणार का?,असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी आयोगाला केला आहे. सिब्बल यांनी याबाबत टि्वट केलं आहे.

"दहशतवादी नागरिकांशी संपर्क असलेल्या व्यक्तींसोबत काँग्रेस मागील दारानं चर्चा करीत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींना एका जाहीर सभेत केला आहे. याबाबत मोदींकडून पुरावे मागण्याची हिमंत निवडणूक आयोग दाखवणार का," असा रोखठोक सवाल कपिल सिब्बल यांनी आयोगाला विचारला आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते मिळविण्यासाठी काँग्रेस, जेडीएससह काँग्रेसने कंबर कसली आहे. यात काँग्रेसने बाजी मारल्याचे सध्याचं चित्र आहे. कारण कर्नाटकातील वीरशैव लिंगायत फोरम ने काँग्रेसला खुला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत 'अच्छे दिन' येण्याची शक्यता आहे. वीरशैव लिंगायत फोरमने पाठिंब्याचे पत्र काँग्रेसला दिले आहे. 'लिंगायत वोट बँक'ला राज्यात फार महत्व आहे. १७ टक्के लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पॉपुलर फ्रंट आँफ इंडिया आणि बजरंग दल या संघटनेवर कारवाई करण्याचा दावा केला आहे. यावरुन राजकारण पेटलं आहे. याप्रकरणी बजरंग दलाने काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या विरोधात ११० कोटी रुपयाचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

याबाबत चंडीगढ येथील विश्व हिंदू परिषदेच्या कायदा सेलचे सहप्रमुख वकील साहिल बंसल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटिस पाठवली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे बजरंग दलातील कोट्यवधी भक्तांचा अवमान झाला आहे. चौदा दिवसाच्या आत ११० कोटी रुपयांच्या मानहानी दंड दिला नाही तर न्यायालयात तक्रार करण्यात येईल.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com