Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस पुनरागमन करणार? ; भाजपचं काय होणार?

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकचा निकाल अवघ्या काही तासांवर...
Karnataka Election :
Karnataka Election :Sarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच शनिवारी लागणार आहे. मात्र त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाज यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धडकी भरली आहे. बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. तर भाजप आपली सत्ता गमावणार असे अनेक एक्झिट पोलचा अंदाज आहे. (Congress will make a comeback in Karnataka What will happen to BJP)

Karnataka Election :
Karnataka Election : भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'चा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसचं 'ऑपरेशन हस्त' !

कर्नाटक निवडणुकीचे राजकीय महत्त्व :

कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही केवळ एका राज्याची सर्वसाधरण निवडणूक नसून, ती आगामी राजकारणाची दिशा ठरवेल, असे अनेक राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येते. कर्नाटक निवडणुकीचे राजकीय महत्त्व केवळ कर्नाटकच्या राजकारणापुरते मर्यादित नसून, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जात आहे.या पार्श्वभूमीवर जर का काँग्रेसला कर्नाटकामध्ये मोठे यश मिळाले तर भाजपची दक्षिणेतल्या राजकारणातून पीछेहाट होण्याचे सावट दिसत आहेत.

Karnataka Election :
Karnataka Election : कर्नाटकात पराभव झाल्यास दक्षिणेतून भाजपचा परतीचा प्रवास; दक्षिणतेल्या राजकारणाचं महत्त्व काय?

भाजपचं काय होणार?

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कर्नाटकात भाजपची सत्ता गेली तर, कर्नाटकातील भाजपच्या लोकसभेच्या जागाही कमी होण्याची शक्यता आहे.जर यावेळी भाजप निवडणूक हरला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात पक्षाच्या जागा कमी होऊ शकतात.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, राज्यातील लोकसभेच्या 28 जागांपैकी भाजपने 25 जागा जिंकल्या आणि त्यांच्या समर्थन दिलेल्या एका अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. कर्नाटकात भाजपचा पराभव झाल्यास राज्यात 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती करणे, पक्षाला कठीण होऊन, परिणामी काँग्रेसच्या जागा वाढू शकतात.

विविध एक्झिट पोल काय सांगतात?

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्ट्रेट एक्झिट पोल काय सांगतो? :

काँग्रेसला 99 ते 109 जागा मिळू शकतात. तर भाजपला 88 ते 98 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 21 ते 26 जागा मिळू शकतात. तर इतर पक्षाला 0 ते 4 जागा मिळू शकतात.

टाइम्स नाऊचा एक्झिट पोल काय सांगतो?:

काँग्रेसला 106 ते 120 जागा मिळू शकतात. तर भाजपला 78 ते 92 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 20 ते 26 जागा इतर पक्षांना 2 ते 4 जागा मिळू शकतात.

झी न्यूज मॅट्रिजचा एक्झिट पोल काय सांगतो? :

काँग्रेसला 103 ते 118 जागा मिळू शकतात. तर भाजप 79 ते 94 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 25 ते 33 जागा मिळू शकतात. तसेच इतर पक्ष आणि अपक्ष 2 ते 5 जागा मिळू शकतात.

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू एक्झिट पोल काय सांगतो? :

काँग्रेसला 94 ते 108 जागा मिळू शकतात. तर भाजपला 85 ते 100 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 24 ते 32 जागा मिळू शकतात. इतरांना 2 ते 6 जागा मिळू शकतात. यानुसार कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती पाहायला मिळू शकते.

न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोल काय सांगतो? :

काँग्रेसला 86 जागा मिळू शकतात. तर भाजप 114 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 21 जागा मिळू शकतात. तीन जागा इतर पक्षाला मिळू शकतात.

टीव्ही 9 कन्नड-सी वोटरचा एक्झिट पोल काय सांगतो? :

काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळू शकतात. भाजपला 83 ते 95 जागा मिळू शकतात. जेडीएसला 21 ते 29 जागा मिळू शकतात. इतर पक्षाला 02 ते 06 जागा मिळू शकतात.

Karnataka Election :
Karnataka Election: निवडणुकीच्या निकालाआधीच कुमारस्वामींचं मोठं विधान; म्हणाले, ही अट मान्य करणाऱ्या पक्षासोबत...

किती टक्के मतदान झाले?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 10 मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि जेडी(एस) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. दरम्यान कर्नाटक विधानसभेसाठी 68 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. हीच मतदानाची आकडेवारी 2018 मध्ये 72 टक्के इतकी होती.

घटेलली मतदानाची टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांच्या फायदेशीर ठरते. सत्ताधाऱ्यांविरोधातील अन्टी इन्कबन्सी फँक्टर काही अंशी मवाळ होते. मात्र मागच्या विधानसभेच्या तुलनेने घटलेली मतदानाची आकडेवारी कुणाच्या पथ्यावर पडणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. भाजप गड राखणार की काँग्रेस पुनरागमन करणार हे उद्याच्या निकालात दिसून येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com