Karnataka Election Result : केवळ चार महिन्यात भाजपने गमावलं दुसरं मोठं राज्य; कुणाकडे किती राज्ये राहिली?

Karnataka Assembly Election Result 2023 : या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये निवडणुका, त्यानंतर लोकसभा..
Karnataka Assembly Election Result 2023 :  Rahul Gandhi : Narendra Modi
Karnataka Assembly Election Result 2023 : Rahul Gandhi : Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे कल येत आहेत. या ताज्या निकालाच्या कलानुसार कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाने जोरदार पुनरागमन केले आहे. कर्नाटकच्या कानडी जनतेने भाजपला सपशेल नाकारले आहे. तर काँग्रेसला पुर्ण बहुमतात सरकार बनवण्याची संधी दिली आहे. ताज्या कलांनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे. (BJP lost another big state in just four months)

कर्नाटक विधानसभेतील एकूण २२४ जागांपैकी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेस जवळपास १३४ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप केवळ ६७ जागांवर आघाडीवर आहे. तसेच कर्नाटकातील तिसरा खेळाडू 'जेडीएस'लाही केवळ १९ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर उर्वरीत सहा जागांवर इतर व अपक्ष आघाडीवर आहेत.

Karnataka Assembly Election Result 2023 :  Rahul Gandhi : Narendra Modi
Karnataka Election Result 2023 : कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री ? डी. के. शिवकुमार की सिद्धरामय्या..

आता हाच कल अंतिमत: कायम राहिला तर काँग्रेस बहुमताचा आकडापेक्षा अधिक जागा मिळवणार हे स्पष्ट आहे. १३४ जागा मिळवून काँग्रेस स्वबळावर मजबुतीने सरकार स्थापन करू शकते. अशाप्रकारे हा केंद्रात आणि विविध राज्यात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा केवळ चार महिन्याच्या कालावधीत दुसरा मोठा पराभव ठरलेला आहे.

फेब्रुवारी महिन्यात हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सत्तापरिवर्तन घडून आले. तेथेही सत्ताधारी भाजपने सरकार गमावले, हिमाचल प्रदेशमध्ये पाच वर्षानंतर काँग्रेसचे सरकार पुन्हा प्रस्थापित झाले होते. मात्र, त्याच महिन्यात गुजरातमध्ये भाजपने पुन्हा आपले सरकार स्थापन केले.

Karnataka Assembly Election Result 2023 :  Rahul Gandhi : Narendra Modi
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. सातत्याने होणाऱ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ही संजीवनी मानली जाते. काँग्रेससाठी हा मोठा दिलासादायक क्षण आहे. काँग्रेससाठीही चार महिन्याच्या कालावधीत काँग्रेस दोन राज्यांत सत्तेवर आली आहे. हिमाचलमध्ये सरकार स्थापन केले, आता कर्नाटकातही काँग्रेसचा मुख्यमंत्री बसणार आहे.

Karnataka Assembly Election Result 2023 :  Rahul Gandhi : Narendra Modi
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

काँग्रेसकडे किती राज्ये?

सध्या हिमाचल प्रदेश व्यतिरिक्त छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही काँग्रेसचे सरकार आहे. याशिवाय बिहार, झारखंड आणि तामिळनाडूमधील आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग आहे. अशाप्रकारे कर्नाटकची भर पडली तर काँग्रेस आता सातव्या राज्यांत सरकार स्थापन करेल. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगड आणि राजस्थान तसेच मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Karnataka Assembly Election Result 2023 :  Rahul Gandhi : Narendra Modi
Karnataka Election Result 2023: काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर...

भाजपकडे किती राज्ये राहिली?

हिमाचल आणि कर्नाटक राज्याची सत्ता गमावल्यानंतर भाजपकडे १५ राज्यात सत्ता राहिली आहे. यापैकी केवळ चार राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे. तर उर्वरीत अकरा राज्यात मित्र व सहयोगीपक्षांसह भाजप सत्तेत आहे. गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड भाजप पुर्ण बहुमतात सरकार आहे. तर अरूणाचल प्रदेश, आसाम, गोवा, हरयाणा, मणिपूर, त्रिपुरा, महाराष्ट्र, नागालँड, पदुच्चेरी, सिक्किम, मेघालय या राज्यात भाजप मित्रपक्ष वा सहयोगी पक्षांसह सत्तेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com