Siddaramaiah vs DK Shivakumar : सत्तानाट्याला ऊत, अधिवेशनाचा पहिला दिवस; सिद्धरामय्या-शिवकुमारांचे आमदार आमने-सामने
Karnataka Assembly Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा कर्नाटक राज्यातील सत्तानाट्याला ऊत आला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्व गटांतील आमदारांनी स्पष्ट भूमिका मांडल्याने नेतृत्व बदलाच्या चर्चेला नव्याने वेग मिळाला आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजी सभागृहात उफाळल्याने फुटीच्या चर्चांना कर्नाटकापासून ते दिल्लीपर्यंत पेव फुटला.
विशेषत: सिद्धरामय्या यांचे पुत्र आणि विधान परिषद सदस्य यतींद्र सिद्धरामय्या यांनी केलेल्या प्रतिक्रियेमुळे वातावरण आणखी तापले. नेतृत्व बदल होणार नाही. सिद्धरामय्या पाच वर्षे काँग्रेसकडून (Congress) मुख्यमंत्री राहतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. शेजारी शिवकुमार यांच्या गटातील आमदारांनी नेतृत्व बदलाची शक्यता सूचित करत अप्रत्यक्ष संदेश दिला.
नेतृत्व बदलाच्या वादावर बोलताना आमदार इक्बाल हुसेन म्हणाले, ‘नेतृत्व बदल काँग्रेसचे हायकमांड ठरवते. विधान करून पक्षाचे नुकसान करू नये. शिवकुमार (DK Shivakumar) मुख्यमंत्री होतील. योग्यवेळी होतील. सहा किंवा नऊ जानेवारीपर्यंत थांबा आणि पाहा. या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. या प्रश्नावर आमदार बसवराज शिवगंगा यांनी मात्र गूढ प्रतिक्रिया देत सांगितले की, दोन जानेवारीला बोलेन. असे म्हणून अधिक भाष्य टाळले.
यतींद्र सिद्धरामय्यांची ठाम भूमिका
यतींद्र म्हणाले, ‘हायकमांड विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहे. पण, सिद्धरामय्या संपूर्ण कार्यकाळात मुख्यमंत्री राहतील. कोणताही बदल होणार नाही. निर्माण झालेला गोंधळ हायकमांडने आधीच दूर केला आहे.’
हायकमांडचा निर्णय अंतिम
यतींद्र यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मंत्री संतोष लाड म्हणाले, ‘मुख्यमंत्री पदाबद्दल आम्ही बोलणार नाही. तशी हायकमांडची स्पष्ट सूचना आहे. काही जण विधान करत आहेत. पण, आम्ही त्यावर प्रतिक्रिया देणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

