BJP MP Pratap Simha : घुसखोरी प्रकरणातील भाजप खासदाराच्या भावाच्या अटकेने तापले राजकारण

Lok Sabha Security Breach : प्रताप सिम्हा म्हैसूरचे भाजपचे खासदार आहेत.
MP Pratap Simha
MP Pratap SimhaSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांपैकी दोन तरूणांना भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्याकडून पास देण्यात आले होते. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर काही दिवसांतच प्रताप सिम्हा यांचे भाऊ विक्रम सिम्हा यांना कर्नाटक सरकारने शनिवारी (30 डिसेंबर) अटक केली. त्यानंतर कर्नाटकातील राजकारण तापले असून मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

प्रताप सिम्हा (Pratap Simha) हे भाजपचे (BJP) कर्नाटकमधील म्हैसूर लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभा घुसखोरी प्रकरणानंतर (Lok Sabha Security Breach) ते प्रकाशझोतात आले आहेत. दरम्यान, आपल्या कार्यालयाकडून दोन तरुणांना केवळ पास देण्यात आले होते. घुसखोरीशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा सिम्हा यांनी केला आहे. पण, विरोधकांनी त्यांच्याही चौकशीची मागणी लावून धरली होती.

MP Pratap Simha
Ram Mandir : निमंत्रणाच्या वादावर अखेर मुख्य पुजारीच बोलले; उद्धव ठाकरे, राऊतांवर संतापले

या घटनेनंतर 15 दिवसांतच खासदारांचे भाऊ विक्रम सिम्हा (Vikram Simha) यांना शनिवारी अटक करण्यात आली. हासन जिल्ह्यातील एका गावात बेकायदेशीरपणे 126 झाडे तोडणे आणि लाकडाची तस्करी करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बंगलुरू शहर गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी त्यांना जामीनही मिळाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या अटकेवरून कर्नाटकमधील राजकारण तापलं आहे. प्रताप सिम्हा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री त्यांचा मुलगा यतिंद्रला म्हैसूरमधून लोकसभा निवडणुकीत उतरवणार आहे. विजयासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. मुलाच्या राजकीय करिअरसाठी ते रस्ता तयार करत असून माझ्या परिवाराचा बळी देत असल्याचा आरोप सिम्हा यांनी केला आहे.

MP Pratap Simha
INDIA Aghadi : नितीशकुमार 'इंडिया' आघाडीचे संयोजक ! काँग्रेसची सहमती, लालूंची नाराजी?

कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाचे राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुणी कायद्याच्या विरोधात जात असेल तर पोलिस किंवा संबंधित विभाग त्यांच्यावर कारवाई करणारच. त्यांनी बेकायदेशीरपणे झाडे तोडली म्हणून वन विभागाने कारवाई केली. हे वन विभागावर सोडून द्यायला हवे, असे परमेश्वर यांनी स्पष्ट केले आहे.

MP Pratap Simha
Congress News: 'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ? काँग्रेसच्या नेत्यांची हायकमांडसोबत तातडीची बैठक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com