C Voter Survey MP Election : मध्य प्रदेशात भाजप सत्ता गमावणार ? ताज्या सर्व्हेत काँग्रेसला अच्छे दिन!

C Voter Survey MP Election : 'कमल'नाथ भाजपला पडणार भारी? काँग्रेसच्या गोटात आनंदी आनंद..
C Voter Survey MP Election
C Voter Survey MP ElectionSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांचे राष्ट्रीय नेते प्रचारासाठी मध्य प्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. या वेळी राज्यात दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत आहे. काँग्रेस पक्ष या वेळी सत्तेत येण्याचा दावा करत आहे. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत.

उमेदवार जाहीर झाल्यानंतर मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण कसे आहे? या वेळी कोणाचे सरकार स्थापन होणार? याबाबत अनेक ओपिनियन पोल घेण्यात आले. याबाबत आता सी-व्होटर संस्थेचा ताजा ओपिनियन पोलचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर या पोलमुळे भाजपची निराशा झाली आहे. (Latest Marathi News)

C Voter Survey MP Election
AIMIM Political News : मध्य प्रदेशात एमआयएम निवडणूक लढवणार; काँग्रेसचा खेळ बिघडवणार

कुणाला किती जागा ?

एबीपी आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये काटे की लढत आहे. सरकारविरोधी लाटेमुळे भाजपला धक्का बसू शकतो, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 230 जागांपैकी भाजपला 99 ते 111 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस 118 ते 130 जागा जिंकून राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करू शकते. अपक्षांना या ठिकाणी 0-2 जागा मिळण्याचा अदाज आहे.

राज्याच्या कोणत्या भागात कोण मजबूत?

सर्वेक्षण अहवालानुसार मध्य प्रदेशातील चंबळ भागात भाजपला नुकसान होऊ शकते. चंबळ विभागातील 34 जागांपैकी सत्ताधारी भाजपला 4 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 26 ते 30 जागा मिळू शकतात. इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.

बघेलखंड प्रदेश येथेही काँग्रेस पुढे दिसते. सर्वेक्षणानुसार बघेलखंड प्रदेशात एकूण ५६ जागा आहेत. यापैकी काँग्रेसला 32-36 तर भाजपला 19-23 जागा मिळण्याची शक्यता आहे.

महाकौशलमध्ये काँग्रेस, तर भोपाळ भागात भाजप पुढे -

मध्य प्रदेशातील महाकौशल भागात काँग्रेसचे वर्चस्व दिसून येत आहे. महाकौशल भागात एकूण 42 जागा आहेत. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक 22-26 जागा मिळू शकतात, तर भाजपला 16-20 जागा मिळण्याची शक्यता आहे. भोपाळ भागात भाजपला थोडी चांगली परिस्थिती आहे. भोपाळ भागात एकूण 25 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, येथे भाजपला 18-22 जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला केवळ 3-7 जागा मिळू शकतात.

C Voter Survey MP Election
NCP Political Crisis: अपात्र का करू नये ? विधिमंडळाच्या नोटिशीवर आमदार बाळासाहेब पाटलांची सूचक प्रतिक्रिया

माळव्यात भाजप आणि निमार भागात काँग्रेस पुढे -

सत्ताधारी भाजपला निमार आणि माळवा भागातून चांगली स्थिती दिसत आहे. मध्य प्रदेशातील माळवा विभागात एकूण 45 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, भाजपला 26-30 जागा, काँग्रेसला 15-19 आणि इतरांना 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे. निमारमध्ये काँग्रेस पुढे दिसत आहे. ओपिनियन पोलनुसार, निमार क्षेत्रातील एकूण 28 जागांपैकी काँग्रेसला 14-18 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 10-14 जागा मिळू शकतात.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com