BJP MP job fraud case : 'माझ्या मृत्यूस भाजप खासदार डॉ. के. सुधाकर जबाबदार'

Karnataka BJP MP Dr. K Sudhakar Accused in 25 Lakh Job Scam, Unemployed Man Dies by Suicide : कर्नाटक मधील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील भाजप खासदार डॉ. के. सुधाकर यांनी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगाराची 25 लाखांची फसवणूक केली.
BJP MP job fraud case
BJP MP job fraud caseSarkarnama
Published on
Updated on

Karnataka crime politics : देशभर बेरोजगारीचा प्रश्न आहे. अशाच बेरोजगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कर्नाटक राज्यातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात घडला आहे.

पण या बेरोजगाराला भाजप खासदारानं फसवलं आहे. गळफास घेताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख असल्याने, खळबळ उडाली आहे.

चिक्कबल्लापूर जिल्हा पंचायत कार्यालयातील कंत्राटी वाहनचालक एम. बाबू (वय 32) यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपचे (BJP) खासदार तसेच माजी मंत्री के. सुधाकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

बाबू याने चिक्कबल्लापूर जिल्हा पंचायत कार्यालयाच्या आवारात असलेल्या झाडाला गळफास घेतला. पोलिसांनी (Police) घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. उत्तरीय तपासणी केली आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत बाबू याने आपल्या आत्महत्येसाठी सुधाकर यांना दोषी ठरविले आहे.

BJP MP job fraud case
Gadchiroli's Transformation story: आरआर आबांची एंट्री गडचिरोलीसाठी ठरली टर्निंग पॉईंट!

चिठ्ठीत, ‘माझ्या मृत्यूस खासदार डॉ. के. सुधाकर हे जबाबदार आहेत. चिक्ककाडिगिनहल्ली इथल्या नागेश नावाच्या व्यक्तीनं आपल्याला सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपये घेतले आणि फसवणूक केली’, असेही त्याने नमूद केले आहे. शिवाय, जिल्हा पंचायतमधील लेखा सहायकावरही त्याने काही गंभीर आरोप केले आहेत.

BJP MP job fraud case
Kala Kendra News : धक्कादायक! 'त्या' कला केंद्रात चालायचा कुंटणखाना : पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचून केला पर्दाफाश

चिक्कबल्लापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आत्महत्येचे कारण आणि मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये उल्लेख असलेल्या व्यक्तींविरोधात सखोल तपास केला जात आहे. कोणत्याही दडपणाशिवाय तपासाचा प्रयत्न असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बाबूने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत थेट भाजप खासदार के. सुधाकर यांचे नाव घेतल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली आहे. पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com