Kala Kendra News : धक्कादायक! 'त्या' कला केंद्रात चालायचा कुंटणखाना : पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचून केला पर्दाफाश

Kala Kendra : दौंड तालुक्यातील चौफुला येथील कला केंद्रात झालेल्या गोळीबारानंतर कला केंद्र चर्चेत आले आहे. त्यानंतर आता बीडमधील कला केंद्रावरील कुंटणखान्याचा पर्दाफाश झाला.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Kala Kendra : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरण राज्यभरात गाजले. अशात पोलिसांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सारूळ पाटीजवळील एका कलाकेंद्रावरील कुंटणखान्याचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला. यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने दोन पीडितांची सुटका केली. यातील एक पीडिता गुजरातमधील आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन पुरुष व एका महिलेविरोधात गुन्हा नोंद झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील सारूळ पाटीजवळ रेणुका कला केंद्रात देहविक्री व्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांना मिळाली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्यासह पथक घेऊन सारूळ गाठले. त्या ठिकाणी डमी ग्राहक पाठवला. छाप्यात पीडितांकडून देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या मीना संतोष खराडे हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेली रक्कम जप्त केली.

या ठिकाणी गुजरात आणि इतर जिल्ह्यांतून पीडित महिलांना आणून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी शेख शफीक शेख हमीद (रा. परभणी) आणि जागामालक रामनाथ ढाकणे (रा. सारूळ) आणि मीना खराडे या तिघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक गात, पोलिस उपनिरीक्षक जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, महिला पोलिस हवालदार उषा चौरे, शोभा जाधव, पोलिस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलिस शिपाई प्रदीप वीर, योगेश निर्धार यांच्या पथकाने केली

Crime News
Kala Kendra Firing : कला केंद्रात पुन्हा राडा : 2 गटात तुंबळ हाणामारी; गोळीबाराचीही चर्चा, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

कळंबच्या कला केंद्रात गोळीबार?

सोमवारी (4 ऑगस्ट) चोराखळी येथील महाकाली कला केंद्रसमोर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता. याचा व्हिडीओही परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण दौंडप्रमाणाचे हे प्रकरणही दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये गोळीबाराचा उल्लेख करण्यात आला नाही. पोलिसांनीही या प्रकरणात गोळीबाराचा उल्लेख केलेला नाही.

Crime News
Daund Firing News : सुपारीच्या खंडाचही व्यसन नाही, गळ्यात तुळशीची माळ; तरी आमदार मांडेकरांचे 'भाऊ' दौंडच्या कला केंद्रात कसे पोहचले?

या प्रकरणी हाणामारी आणि जीवे मारण्याची धमकी अशी परस्परांविरुद्ध तक्रार देण्यात आली. त्यानुसार 9 जणांसह इतर अनोळखी 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण यात गोळीबाराचा उल्लेख टाळण्यात आला आहे. तपासाचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून पोलिसांनीच गोळीबार प्रकरण दाबल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे. या हाणामारीमध्ये 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर धाराशिव येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com