मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं! डिझेल 19 तर पेट्रोल 13 रुपयांनी स्वस्त

मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. आता याचेच अनुकरण करीत मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिवाळी गोड केली आहे.
Basavraj Bommai and Narendra Modi
Basavraj Bommai and Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. आता याचेच अनुकरण करीत कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी जनतेची दिवाळी गोड केली आहे. त्यांनी राज्यात पेट्रोल 13.30 तर डिझेल 19.47 रुपयांनी स्वस्त केले आहे.

मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली आहे. राज्य सरकारने डिझेलवरील व्हॅट 7 रुपये आणि पेट्रोलवरील व्हॅट 7 रुपयांनी कमी केला आहे. यामुळे राज्यात पेट्रोल एकूण 13.30 रुपये आणि डिझेल 19.47 रुपये स्वस्त झाले आहे. आता कर्नाटकात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100.63 आणि डिझेलचा दर 85.03 रुपयांवर आला आहे. यानंतर कर्नाटक भाजपने विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांना कर कपातीचे आव्हान दिले आहे.

Basavraj Bommai and Narendra Modi
पेट्रोल, डिझेलनंतर आता एलपीजी सिलिंडरची मिळणार गुड न्यूज?

उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

Basavraj Bommai and Narendra Modi
तुम्हाला एलपीजी सबसिडी मिळणार का? मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com