Karnataka Bhavan fight news : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये ‘बूट फाईट’

Karnataka CM Siddaramaiah Commissioner and DCM Shivakumar Officer Clash at Karnataka Bhavan Delhi : कर्नाटकामधील नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये त्यांच्या दोन्ही विशेष अधिकाऱ्यांमध्ये 'बूट फाईट' रंगल्याची चर्चा सुरू आहे.
Karnataka Bhavan fight news
Karnataka Bhavan fight newsSarkarnama
Published on
Updated on

Karnataka politics Delhi incident : कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात वाद सुरू असतानाच नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये त्यांच्या दोन्ही विशेष अधिकाऱ्यांमध्ये 'बूट फाईट' रंगल्याची चर्चा सुरू आहे.

या दोघांमधील वाद वाढत जाऊन एकमेकांना बुटांने मारल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सिद्धरामय्या यांचे विशेष कर्तव्य अधिकारी असलेले कर्नाटक भवनचे सहायक निवासी आयुक्त मोहनकुमार सी. आणि शिवकुमार यांचे विशेष अधिकारी एच. अंजनेय यांच्यातील हाणामारीची तक्रार सिद्धरामय्या, शिवकुमार आणि निवासी आयुक्तांपर्यंत पोचली आहे.

अंजनेय यांनी मोहनकुमार यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करावी, अशी तक्रार केली आहे. शिवकुमारांचे (Shivakumar) विशेष अधिकारी एच. अंजनेय यांनी आरोप केला आहे की, मोहनकुमार यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्याला बुटाने मारण्याचा प्रयत्न केला. अंजनेय यांनी वयाने लहान असलेले मोहनकुमार यांनी अहंकाराचे प्रदर्शन केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे एसडीओ म्हणून अहंकार दाखविल्याल्याचा आरोप केला.

अंजनेय यांनी 22 जुलै रोजी कर्नाटक भवनचे आयुक्त इमकोंगला जमीर यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि त्याच्या प्रती उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना सादर केल्या. दरम्यान, सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी, या घटनेची पूर्णपणे माहिती नाही आणि तपशील मिळाल्यानंतरच बोलेल, असे सांगितले.

Karnataka Bhavan fight news
Sharad Sonawane atrocity act : MLA सोनवणेंच्या अडचणी वाढल्या, ॲट्रॉसिटीनुसार कारवाई अन् आमदारकी रद्द...

अंजनेय यांनी, मोहनकुमार यांनी सहायक निवासी आयुक्त (श्रेणी 2) म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या पदोन्नती आणि पोस्टिंगमध्ये अडथळा आणत आहेत. तर मोहनकुमारच्या यांनी कक्षात बूट काढून सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच महिला कर्मचाऱ्यांसमोर मारण्यास सरसावल्याचा आरोप अंजनेय यांनी केला. मोहनकुमार यांच्यापेक्षा मी वरिष्ठ असूनही त्यांनी मला लेखा अधिकारी (प्रभारी) म्हणून बढती देऊ दिली नाही, असाही आरोप अंजयने यांनी केला.

Karnataka Bhavan fight news
Nagpur child mortality rate : धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बालमृत्यूंचे प्रमाण अधिक; ग्रामीणपेक्षा मुंबईत भयावह स्थिती

मोहनकुमार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, अंजनेय हे भवन कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यात निष्काळजी होते. ते परवानगीशिवाय माझ्या खोलीत येत. त्यांच्या बढतीबद्दल बोलत असत. अंजनेयविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. त्याची चौकशी होऊ द्या. कारण त्यानंतर सत्य बाहेर येईल, असे सांगितले.

दरम्यान, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी डिलिट केल्याची चर्चा आहे. कर्नाटक भवनाचे प्रशासन गटबाजीने ग्रस्त आहे. 24 जुलैला एका अपंग महिला कर्मचाऱ्यांनी अंजनेय यांच्याविरुद्ध कर्नाटक महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com