
Maharashtra highest child mortality : बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चाच्या विविध योजना राबविल्या जात असताना पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांत गेल्या तीन वर्षांत शून्य ते पाच वर्षांतील तब्बल 49 हजार 80 बालमृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
यात सर्वाधिक संख्या नागपूरमध्ये 4 हजार 218 आणि त्याखालोखाल मुंबईत 4 हजार 134 बालमृत्यू झाले आहेत.
मुंबईसारख्या (Mumbai) जागतिक शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा कुपोषण, आरोग्यासंदर्भात सुविधा उपलब्ध असतानाही बालमृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे. यावरून मुंबईतील बालमृत्यूंची स्थिती भयावह असल्याचे दिसून आले. याच कालावधीत बालमृत्यूंसोबत दुसरीकडे मातामृत्यूंचेही प्रमाण 3हजार 786 इतके असून, मुंबईत राज्यातील सर्वाधिक 570 इतके मातामृत्यू झाले आहेत.
त्याखालोखाल नागपूरमध्ये (Nagpur) 409 आणि पुण्यात 374 इतक्या मातांचे मृत्यू झाले असल्याची माहिती आरोग्य सेवा कुटुंब कल्याण माता बाल संगोपन शालेय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जानेवारी 2022 ते 22 जुलै 2025 या कालावधीतील ही बालमृत्यूंची आकडेवारी आहे. तर माता मृत्यूंची 1 जानेवारी 2022 ते एप्रिल 2025 या कालावधीतील माहिती असून, ती माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना विभागाकडून माहिती अधिकारात देण्यात आली आहे.
राज्यात या कालावधीत गर्भातच मृत्यूंचे प्रमाणही तब्बल 42 हजार 384 इतके आहे. मुंबईसारख्या शहरात बालमृत्यूंसोबत गर्भातच बालमृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचेही दिसून आले आहे. मागील तीन वर्षांत एकट्या मुंबईत 4 हजार 320 बाळांचे गर्भातच मृत्यू झाले आहेत. पुण्यात ही संख्या चार हजार 354 इतकी असून, ती राज्यात सर्वाधिक आहे. तर नागपुरात 1 हजार 472 इतकी गर्भातच मृत्यू झाल्याची संख्या आहे.
अकोला- 2262,अमरावती- 2137, यवतमाळ-901, छत्रपती संभाजीनगर- 1556, मुंबई- 4134, नागपूर- 4218, पुणे- 2928, राज्य एकूण- 49080.
मुंबई- 570, पुणे- 375, छत्रपती संभाजीनगर- 203, नागपूर- 409, अमरावती- 118, अकोला- 76, यवतमाळ- 92, राज्य एकूण- 1848.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.