
ED action against Congress MLA : कर्नाटकच्या चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना करचुकवेगिरी आणि गेमिंग ॲपद्वारे बेकायदा मालमत्ता संपादन केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली.
सिक्कीमच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार पप्पी यांना कोलकाता इथल्या 'ईडी'च्या पथकाने अटक करून बंगळूरला आणले आहे.
'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी बंगळूर, चित्रदुर्ग, चळ्ळकेरे, गोवा आणि इतर ठिकाणी छापे टाकले आणि कागदपत्रे जप्त केली. तसेच त्यांच्या घरात एक किलोपेक्षा जास्त सोने सापडले. यानंतर 'ईडी'ने 2023 च्या निवडणुकीत बंगळूरमधील राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या आणि पराभूत झालेल्या काँग्रेस (Congress) उमेदवार कुसुमा हनुमंतरायप्पा यांच्या निवासस्थानीही छापा टाकला.
गोव्याची राजधानी पणजीमध्ये मॅजेस्टिक प्राईड नावाचा कॅसिनो चालवणारा तसेच हवाला किंगपिन सुमंदर सिंग याच्या हुबळी इथल्या देशपांडेनगर मधील कामाक्षी अपार्टमेंटवरही छापे टाकले. कर्नाटक (Karnataka), गोवा आणि सिक्कीमसह एकाच वेळी 17हून अधिक ठिकाणी छापे टाकणाऱ्या 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, बँक रेकॉर्ड, जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केल्या.
वीरेंद्र पप्पी यांना बेकायदा व्यवहार, करचुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करून बंगळूरला आणण्यात आले आहे. शांतिनगर इथल्या ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. करचोरी आणि गेमिंग ॲपबाबतच्या तक्रारीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी वीरेंद्र पप्पी आणि सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या भावाच्या निवासस्थानीही छापा टाकला.
कर्नाटक आणि गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. के. सी. वीरेंद्र यांच्या मालकीच्या कंपन्यांकडून गेमिंग ॲपमध्ये बेकायदा पैसे हस्तांतरित केल्याचे आरोप होते. वीरेंद्र यांच्या मालकीच्या रत्ना गोल्ड, रत्ना मल्टी सोर्स, पपी टेक्नॉलॉजी, रत्ना गेमिंग सोल्युशन्स यांसारख्या इतर कंपन्यांकडून बेकायदेशीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.