Congress MLA betting scam : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराचा ऑनलाईन बेटिंग प्रकरणात 2000 कोटींचा व्यवहार; परदेशापर्यंत नेटवर्क

Veerendra Puppy ₹2000 Crore Betting Scam Exposed by ED : 'ईडी'ने अटक केलेले कर्नाटकमधील काँग्रेस आमदार Veerendra Puppy यांचा ऑनलाईन बेटिंग प्रकरणात सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Veerendra Puppy
Veerendra PuppySarkarnama
Published on
Updated on

Online betting scam India : कर्नाटकमधील काँग्रेसचे चित्रदुर्गचे आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बेकायदेशीर ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात त्यांचा सहभाग ईडीला (अंमलबजावणी संचालनालय) आढळला आहे. आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या चळ्ळकेरे इथल्या घरावर आणि फेडरल बँकेतील दोन लाॅकरवर छापा घालून तब्बल 50.33 कोटी रुपयांचे सोनं जप्त केलं आहे.

'ईडी'ने आतापर्यंत केलेल्या तपासात आमदार पप्पी यांचा दोन हजार कोटींच्या व्यवहारात तपास दिसून आला आहे. 'ईडी'च्या या कारवाईमुळे कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेसविरोधात विरोधकांना आयते कोलीत सापडले आहे. 'ईडी'च्या या कारवाईनंतर कर्नाटकमधील भाजप सत्ताधारी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर तुटून पडला आहे.

काँग्रेसचे (Congress) आमदार वीरेंद्र पप्पी यांच्याविरोधात केलेल्या कारवाईवर 'ईडी'ने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. चळ्ळकेरे इथल्या घरावर आणि फेडरल बँकेतील दोन लाॅकरवरील छाप्यापूर्वी 'ईडी'ने आमदार वीरेंद्र पप्पी यांची 103 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्यात 21 किलो सोने, रोख रक्कम, दागिने आणि आलिशान वाहनांचा समावेश आहे. आतापर्यंत आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या ताब्यातून एकूण 150 कोटींची रोकड आणि सोने जप्त केलं आहे.

'ईडी'ने (ED) त्यांच्या निवासस्थानासह फेडरल बँकेतील लॉकरांची तपासणी केली. यामध्ये 40 किलो सोन्याचे बार आढळले. आमदार पप्पी आणि त्यांचे काही नातेवाईक व मित्र बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग वेबसाईटचे ऑपरेशन चालवत होते. मिळालेली रक्कम फोन-पेसारख्या डिजिटल पेमेंट गेटवेमार्फत गोळा केली जात होती. नंतर ती रक्कम म्युचुअल अकाउंट्सच्या नेटवर्कद्वारे भारतातील आणि परदेशातील ऑपरेटरकडे हस्तांतरित केली जात होती.

Veerendra Puppy
Sangamner city defacement : थोरात अन् तांबेंचा मोठा निर्णय, विद्रूपिकरण करणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून माघार; राजकीय तणावाला कारण नकोच!

दोन हजार कोटींचा व्यवहार

'ईडी'ने आतापर्यंत केलेल्या तपासात आमदार वीरेंद्र पप्पी यांचा सुमारे दोन हजार कोटींच्या व्यवहारात सहभाग दिसून आला आहे. सट्टेबाजीतून मिळालेली रक्कम बेकायदेशीररीत्या परदेशी बँक खात्यांमध्ये वळवली. पप्पी, त्यांचे भाऊ के. सी. तिप्पेस्वामी आणि पृथ्वीराज यांनी दुबईमध्ये कॉल सेंटर स्थापन करून ऑनलाईन गेमिंग व्यवसाय चालवला होता, असेही 'ईडी'च्या तपासात समोर आलं आहे.

Veerendra Puppy
Top 10 News: विधानसभेला 20 हजार मतदानं बाहेरून आणलं! विलास भुमरेंचा खळबळजनक खुलासा ते नागपुरातील मोर्चानंतर बावनकुळेंचे मोठे विधान

परदेशात मोठं साम्राज्य

'ईडी'ने कोलकाता शाखेच्या मदतीने आमदार पप्पींना सिक्कीममधील गंगटोक इथून अटक केली. त्यांना बंगळुरातील कोरमंगल इथल्या न्यायालयासमो हजर केलं. सीसीएच न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची 'ईडी' कोठडी सुनावली. 28 ऑगस्टला त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आमदार वीरेंद्रपप्पी आणि त्यांच्या नेटवर्कने राज्यातच नव्हे, तर परदेशातही बेकायदेशीर सट्टेबाजीचे मोठे साम्राज्य उभे केल्याचं समोर आल्यानं त्यांच्या जामिनासाठी अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com