Sangamner city defacement : थोरात अन् तांबेंचा मोठा निर्णय, विद्रूपिकरण करणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून माघार; राजकीय तणावाला कारण नकोच!

Balasaheb Thorat & Satyajeet Tambe Remove Political Flex in Sangamner : विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरमधील राजकीय तणाव सर्वश्रुत असताना, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी मोठा निर्णय घेत, कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.
Sangamner city defacement
Sangamner city defacementSarkarnama
Published on
Updated on

Congress leaders remove political flex : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संगमनेरमधील राजकीय बाज पूर्णपणे बदलला. संघर्षाचं राजकारण संगमनेरमध्ये सुरू झालेलं दिसलं. आजही हा राजकीय संघर्ष कधी उफाळून येईल, याचा नेम नाही. पण राज्याच्या राजकारणात सुसंस्कृत राजकारणी म्हणून, ज्यांनी ओळख निर्माण केली आहे, त्यांनी मात्र आपल्या बालेकिल्ल्यात पराभवानंतर ती प्रतिमा कायम ठेवत, आता मोठा निर्णय घेतला आहे.

संगमनेरचं विद्रूपिकरण थांबवण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अन् त्यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी, शहरातील फ्लेक्स काढून घेतले आहे. थोरात-तांबे मामा-भाचे यांनी कार्यकर्त्यांना त्यांचे फोटो असलेले फ्लेक्स काढून घेण्यास सांगताच, तशी कार्यवाही देखील सुरू झाली. तसंच नगरपालिका मुख्याधिकारी यांना देखील निवेदन दिलं. थोरात-तांबे मामा-भाचे यांच्या या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांवर काय परिणाम होता, याची आता चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) अन् महाविकास आघाडीत घमासान झालं. महाराष्ट्रात महायुतीला, महाविकास आघाडीनं चांगलाच दणका दिला. अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे शिर्डी आणि अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात, दोन्ही ठिकाणचे उमेदवार पडले. यात भाजपचे सुजय विखे पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. महाविकास आघाडीच्या या यशात बाळासाहेब थोरात यांनी किंगमेकरची भूमिका बजावली. विखे पाटील या पराभवामुळे चांगलेच घायाळ झाले.

पुढं विधानसभा निवडणुकीत वचपा घेण्यासाठी विखे पाटील यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात ताकद उभी केली. परिणामी अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला दहा आणि मविआला फक्त दोन जागा मिळाल्या. यात संगमनेरमधील बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) देखील पराभवाचा धक्का बसला. विखे पाटील यांच्या पाठबळावर अमोल खताळ यांनी मुंबई मंत्रालय गाठले.

Sangamner city defacement
Prakash Chitte Girish Mahajan meeting : भाजपच्या 'संकटमोचकां'कडून प्रकाश चित्ते शब्दच घेऊन आले; 'काळजी करू नका, सर्व ठीक होईल'

मात्र, संगमनेर शहरात आमदार खताळ आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष वेळोवेळी उफाळून आला आहे. हा संघर्षातून दोन्ही बाजूने शहरात फ्लेक्सबाजी झाली. संपूर्ण शहर राजकीय फ्लेक्सबाजीने झोकले गेले. बाजारपेठेवर देखील त्याचा परिणाम झाला. दुकानांच्या पाट्यांपेक्षा राजकीय फ्लेक्स जास्त दिसू लागले. हे राजकीय शक्तिप्रदर्शन संगमनेर शहराचं विद्रूपिकरण करत असल्याचे चर्चा व्यापारी, कामगार, दुकानदार, उद्योजकांसह सर्वसामान्यांमध्ये होती.

Sangamner city defacement
Nilesh Ghaywal controversy : घायवळच्या मामाची धमाकेदार 'एन्ट्री'; रोहित पवारांच्या 'पाॅलिटिक्स'वर संतापले! अनिल देशमुखांचंही नाव घेतलं

नगरपरिषदेकडे कारवाईची मागणी

सत्यजीत तांबे यांनी, हे सर्व अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढले जावे, याकरता यासाठी पुढाकार घेतला, तसंच नगरपरिषदेला निवेदन देत अनधिकृत फ्लेक्सवर कारवाईची मागणी केली. निवेदनात म्हटले की, "संगमनेर हे केवळ शहर नाही. तर ती आपली संस्कृती व ओळख आहे. 1991 मध्ये डॉ. सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराचे नेतृत्व करत शांतता निर्माण केली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवून शहराला वैभवशाली बनवले. दुर्गाताई तांबे यांनी स्वच्छ व सुंदर संगमनेर बनवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. मात्र मागील काही दिवसांपासून संगमनेरमध्ये खूप फ्लेक्सबाजी होत आहे. ही अनाधिकृत फ्लेक्सची स्पर्धेवर थेट कारवाई झाली पाहिजे."

फ्लेक्स मागचं राजकारण

'या फ्लेक्समुळे विद्रूपिकरण होतेच, पण त्यातून राजकीय वाद व तणाव वाढतो. फ्लेक्स फाडण्याचे प्रकार सुद्धा झाले आहेत. कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शांत व सुसंस्कृत वातावरण बिघडत चालले आहे. त्यामुळे संगमनेर शहराला पुन्हा एकदा चांगले वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी फ्लेक्स काढून घ्यावेत,' असे आवाहन देखील सत्यजीत तांबे यांनी केले.

बाळासाहेबांची थेट कृती

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी देखील भाचाच्या या निर्णयाचे स्वागत करत, थेट कृती केली. संगमनेर हायटेक बस स्थानक पूर्ण केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये फ्लेक्स लावले. यावर बाळासाहेब थोरात यांनी स्वतः उतरून सर्व स्वतःचे फ्लेक्स काढून घेतले. बसस्थानक परिसर अत्यंत मोकळा व स्वच्छ केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com