Karnataka CM Posters: कर्नाटकात CM पदावरुन पोस्टर वॉर सुरु : डी.के. शिवकुमार अन् सिद्धरामय्या यांच्या..

DK Shivakumar vs Siddaramaiah Banner War: दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे.
 DK Shivakumar vs Siddaramaiah
DK Shivakumar vs Siddaramaiah Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Congress Poster War: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकात मोठा विजय मिळवला आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार यावरुन राज्यात काँग्रेसअंतर्गत संघर्ष सुरु झाला आहे. मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात रस्सीखेच सुरु आहे.

मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असले तरी डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या समर्थकांमध्ये जुंपली आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे.

 DK Shivakumar vs Siddaramaiah
BJP First Win In Deoband: उत्तर प्रदेशात मुस्लिम बहुल क्षेत्रात १४० वर्षानंतर कमळ फुललं ; पहिले हिंदू नगराध्यक्ष..

राजस्थान प्रमाणेच कर्नाटकातही काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. आमचाच नेता मुख्यमंत्री होईल, असा दावा करीत डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी केला आहे. त्यासाठी कर्नाटकात विविध ठिकाणी पोस्टर वॉर सुरु झाले आहे. "भावी मुख्यमंत्री.." म्हणून दोन्ही नेत्यांचे बॅनर झळकत आहेत.

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी काँग्रेसने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्या मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापुरहून विशेष विमानाने काल बंगळुरुला रवाना झाले आहेत.

कोणाला मुख्यमंत्री करायचे हे काँग्रेसला ठरवायचे आहे? यासाठी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बंगळुरू येथील शांग्री-ला हॉटेलमध्ये काल बैठक झाली. डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासह सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत ठरवण्यात आले की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करतील. सिद्धरामय्या यांनी हा प्रस्ताव मांडला होता, त्याला शिवकुमार यांच्यासह सर्व आमदारांनी पाठिंबा दिला.

 DK Shivakumar vs Siddaramaiah
Karnataka Next CM: काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपली; मुख्यमंत्रीपदाचा निर्णय नाहीच, चेंडू खर्गेंच्या कोर्टात

संकटमोचक म्हणून शिवकुमार ..

काँग्रेसमधील मनी अँड मसल पॉवर असलेले नेते म्हणून डी.के.शिवकुमार हे ओळखले जातात. त्यांना काँग्रेसचे संकटमोचकही म्हटले जाते. महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचे सरकार संकटात सापडले होते, तेव्हा शिवकुमार यांनीच रिसॉर्ट पॉलिटिक्स करुन ते सरकार वाचवले होते. देशात कुठेही काँग्रेसच्या सरकारमध्ये सत्तापेच निर्माण झाला तर संकटमोचक म्हणून शिवकुमार यांची आठवण काँग्रेस नेत्यांना होते. त्यांचाही मुख्यमंत्रीपदावर दावा आहे.

सिद्धरमैय्या हे अनुभवी..

सिद्धरमैय्या हे अनुभवी आहेत. शासन आणि प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे. २०१३ ते २०१८ दरम्यान ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. अलीकडच्या काळात पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. जनता दल, जेडी(एस), काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com