Karnataka Election 2023 : महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसचा मोठा डाव ; सत्ता आल्यास...

Karnataka Congress : आम्ही पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाच आश्वासने पूर्ण केली आहेत.
Karnatak Election 2023
Karnatak Election 2023Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Congress Promises Free Travel for Women : काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा प्रचारात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

उड्डपी आणि दक्षिण कर्नाटकमध्ये प्रचार करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना राज्य सरकारची सार्वजनिक बससेवा ही मोफत केली जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेले आश्वासन पाळले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, " गेल्या निवडणुकीत काँग्रेसने दिलेली चार आश्वासने पाळली नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणतात, पण आम्ही चार आश्वासने दिली होती, त्यातील एक आश्वासन पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत पूर्ण केले आहे. आम्ही पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाच आश्वासने पूर्ण केली आहेत.

कर्नाटकातील भाजप सरकारने विविध विकासकामामधून ठेकेदाराकडून ४० टक्के कमिशन घेऊन महिलांची फसवणूक केली आहे. आमचे सरकार आले तर आम्ही महिलांसाठी सार्वजनिक बससेवा मोफत करणार आहोत.

Karnatak Election 2023
JDS Manifesto For Karnataka Election : गर्भवतींना JDS देणार सहा हजार रुपये मानधन, अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ..

गृहज्योती योजनेच्या माध्यमांतून महिन्याला दोनशे यूनिट मोफत वीज देण्यात येणार आहे, तर गृह लक्ष्मी योजनेत कुटुंबातील प्रमुख महिलेला दोन हजार रुपये, अन्न भाग्य योजनेत दारिद्र रेषेखालील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा १० किलो तांदुळ देण्यात येणार आहे.

याशिवाय डिप्लोमा केलेल्या पण बेरोजगार असलेल्या युवकाला दोन वर्ष पंधराशे रुपये, तर बेरोजगार युवकांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

Karnatak Election 2023
Raj Thackeray Interview : रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर अजित पवार ? ; "...काकांकडेपण लक्ष द्या.."

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस, भाजप,आणि जेडीएस यांच्यात लढत होत आहे. तीनही पक्षानी कर्नाटकची सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. जेडीएसने २०१८ मध्ये काँग्रेसच्या सत्ता स्थापनेत किंग मेकरची भूमिका बजावली होती. यंदाच्या निवडणुकीत जेडीएस किंग मेकरची भूमिका बजावणार असल्याचे चित्र आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com