DK Shivakumar : शिवकुमार यांची जादू US च्या निवडणुकीतही चालणार? ट्रम्प की कमला हॅरिस, कुणाचं आलं बोलावणं?   

Kamala Harris Barack Obama Donald Trump US Election 2024 : अमेरिकेतच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये लढत होत आहे.
DK Shivakumar, Kamala Harris, Donald Trump
DK Shivakumar, Kamala Harris, Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना थेट अमेरिकेतून निमंत्रण आले आहे. अमेरिकेत सध्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहचलेला असताना शिवकुमार यांना न्यूयॉर्कमधून बोलावणे आले आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार, विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यामध्ये लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. कधी ट्रम्प यांचे तर कधी कमला हॅरिस यांचे पारडे जड वाटत आहे.

DK Shivakumar, Kamala Harris, Donald Trump
Yogi Adityanath : योगींचे शिष्य काँग्रेसमध्ये करणार प्रवेश; ‘सनातन’वर केलं मोठं विधान...

कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असल्याने त्यांच्याविषयी उत्सुकता वाढली आहे. त्यातच कमला यांच्याकडून शिवकुमार यांना निमंत्रित करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. ते आजच अमेरिकेला रवाना होणार असल्याचे वृत्त रिपब्लिकन टीव्हीने दिले आहे.

कमला हॅरिस आणि ट्रम्प यांच्यामध्ये 10 सप्टेंबरला सामोरासमोर चर्चा होणार आहे. त्याआधीच शिवकुमार यांना बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधीही अमेरिकेत आहेत. ते तिथे विविध घटकांशी संवाद साधत आहेत. आता शिवकुमारही अमेरिकेला जाणार असल्याने दोन्ही नेते अमेरिकेत भेटणार का, याबाबतही उत्सुकता आहे.

DK Shivakumar, Kamala Harris, Donald Trump
Manju Hooda : गँगस्टरची पत्नी, DSP ची लेक... माजी मुख्यमंत्र्यांसमोर भाजपच्या महिला उमेदवाराचं तगडं आव्हान

शिवकुमार हे अमेरिकेत कमला हॅरिस यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या भेटीची माहिती अद्याप अधिकृतपणे समोर आले नाहीत, असे ‘रिपब्लिक’च्या वृत्तात म्हटले आहे.  

मागील काही महिन्यांपासून कमला हॅरिस या शिवकुमार यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे या दोन नेत्यांच्या न्यूयॉर्कमधील भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार, हे महत्वाचे मानले जात आहे. दरम्यान, राहुल गांधी शुक्रवारी रात्रीच अमेरिकेला गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com