

Dharwad Jail Inspector Mental Harassment Case : धारवाड केंद्रीय कारागृहाचे तुरुंग निरीक्षक सिद्धरामप्पा वड्डर यांच्या आत्महत्येप्रकरणी खळबळ उडाली असून, राज्य कारागृह विभागाचे महासंचालक (डीजीपी) आलोककुमार यांच्यावर सिद्धरामप्पा यांच्या पत्नी लक्ष्मी यांनी गंभीर आरोप केले आहेत. सिद्धरामप्पा यांच्या मृत्यूसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेला मानसिक छळ जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून, डीजीपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
कर्तव्यात कसूर केल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी वड्डर यांना निलंबित केले होते. त्यानंतर त्यांची बदली म्हैसूर कारागृहात केली होती. ते नव्या ठिकाणी रुजू होण्याच्या तयारीत असतानाच शुक्रवारी सकाळी धारवाड येथील निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
पत्नीची पोलिसांत तक्रार
याप्रकरणी सिद्धरामप्पा यांच्या पत्नी लक्ष्मी यांनी धारवाड उपनगर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विभागीय चौकशीच्या नावाखाली पतीला निलंबित केले होते. या कारवाईमुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे.
१२ जून रोजी धारवाडच्या नवीन बसस्थानकाजवळील कारागृह कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी सिद्धरामप्पा यांचा मृतदेह आढळून आला होता. लक्ष्मी वड्डर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अधिकृत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत किमान तीनवेळा त्यांच्या पतीचा इतर अधिकाऱ्यांसमोर अपमान झाला.
‘सिद्धरामप्पा, तुला कोणती शिक्षा द्यावी ते तूच सांग’, अशा शब्दांत त्यांना सार्वजनिकरीत्या सुनावले होते. या सततच्या अपमानामुळे आणि निलंबनामुळे ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेले होते, असा आरोप त्यांनी केला.
निष्पक्ष चौकशीची मागणी
सिद्धरामप्पा यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि आलोक कुमार यांच्याविरोधात निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.