Female Lawyer Suicide Case : गेट वे ऑफ इंडियाजवळ सापडला महिला वकिलेचा मृतदेह; 40 कोटींच्या डीलमागील गूढ? ज्येष्ठ विधिज्ञाभोवती कारवाईचा फास

Suicide note leads FIR against senior lawyer and his son over alleged ₹40 crore property deal fraud and mental harassment : 40 कोटींच्या मालमत्ता व्यवहारातून वाद; मृत्यूपूर्वीच्या पत्रात कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, कुलाबा पोलिसांची मोठी कारवाई
Female Lawyer Suicide Case
Female Lawyer Suicide CaseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Crime News : गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात गेल्या महिन्यात आढळलेल्या 56 वर्षीय महिला वकिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मृत महिलेने लिहिलेल्या पत्राच्या आधारे कुलाबा पोलिसांनी एका ज्येष्ठ विधिज्ञ आणि त्यांच्या मुलाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

या पत्रात आरोपींनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, मृत महिला स्वतःही वकिली व्यवसायात कार्यरत होती. तिच्या वडिलांचा आणि सख्ख्या काकांचा मालमत्तेवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू असताना वडिलांच्या निधनानंतर महिलेने आपल्या बाजूने लढण्यासाठी संबंधित ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती केली होती.

उच्च न्यायालयाने (High Court) महिलेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर विरोधी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर महिलेने आपल्या वाट्याची मालमत्ता विक्रीस काढली.

Female Lawyer Suicide Case
Girlfriend Family Assault : लव्ह स्टोरीचा दुर्दैवी शेवट! प्रेयसीसोबत दिसताच, बेदम मारहाण; नैराश्यात युवकानं संपवलं जीवन, मुलीच्या वडिलांना अटक

याच काळात आरोपी वकिलाने ती मालमत्ता 40 कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी दर्शवली. दोघांमध्ये व्यवहार निश्चित झाला आणि आगाऊ रक्कम म्हणून सुमारे अडीच कोटी रुपये देण्यात आले. मात्र त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याचा आरोप आहे. अखेर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महिलेने हा व्यवहार रद्द केला.

Female Lawyer Suicide Case
Rape Case Quashed : ‘प्रेम, गैरसमज अन् बलात्काराचा गुन्हा’; लग्नानंतर हायकोर्टाचा मोठा दिलासा, खटला थेट रद्द!

व्यवहार रद्द झाल्यानंतर आरोपी वकिलाने महिला आणि तिच्या कुटुंबीयांना नोटीस पाठवून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. तसेच खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देत बार कौन्सिलकडे तक्रार करून वकिलीचा परवाना रद्द करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या कथित मानसिक त्रासामुळे महिला प्रचंड तणावाखाली गेली होती. त्यातून तिने औषधांचा अतिमात्रेत सेवन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. उपचार सुरू असतानाच ती अचानक बेपत्ता झाली. काही दिवसांनंतर गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात तिचा मृतदेह आढळून आला.

मृत्यूनंतर महिलेने लिहिलेले पत्र कुटुंबीयांच्या हाती लागले. त्यामध्ये आरोपी वकील आणि त्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या आधारे कुलाबा पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com