MLA Munirathna Attack: भाजप आमदाराच्या डोक्यात मारली अंडी, काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांचा हात?

Egg thrown at Karnataka BJP MLA : आमदार मुनीरत्न हे भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लक्ष्मी देवी नगर वॉर्डात जात असताना त्यांच्यावर अंडी फेकण्याची घटना घडली.
MLA Munirathna
MLA Munirathnasarkarnama
Published on
Updated on

Karnataka News: कर्नाटकमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप वातावरण तापले आहे. बेंगळुरूमध्ये भाजपचे आमदार आणि माजी मंत्री मुनीरथना यांच्यावर कोणीतरी अंडी फेकली. अंड्यांच्या आडून आपल्याला जीवे मारण्याचा प्लॅन होता, असा आरोप मुनीरथना यांनी केला. आपल्याला काही झाले तर त्याला उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, त्यांचे भाऊ डीके सुरेश, काँग्रेस नेत्या कुसुमा आणि त्यांचे वडील हनुमंत्रयप्पा हे जबाबदार असतील, असे मुनीरत्न यांनी म्हटले आहे.

मुनीरत्न हे भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लक्ष्मी देवी नगर वॉर्डात जात असताना त्यांच्यावर अंडी फेकण्याची घटना घडली. ते त्यांच्या समर्थकांसह भाजप कार्यालयाकडे जात असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर अंडे फेकले ते त्यांच्या डोक्याला लागले.

MLA Munirathna
Hingoli Firing Video : धक्कादायक! पोलिस दलातील जवानाचा कुटुंबावर गोळीबार, पत्नी जागीच ठार तर दीड वर्षांचा चिमुकला...

मुनीरत्न यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी 100 पोलिस हजर होते. आपली हत्या होण्याची शक्यता असल्याने आपल्या संरक्षणासाठी ते तैनात करण्यात आले असल्याचा दावा देखील मुनीरत्न यांनी केला आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र

आमदार मुनीरत्न यांनी सांगितले की, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन लोक वकिलांच्या वेशात आपल्याला भेटायला आले आणि त्यांनी सांगितले कीआपली हत्या होऊ शकते. यासंदर्भात भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय यांना पत्र लिहून आपली हत्या झाल्यास त्याला डीके शिवकुमार, डीके सुरेश, कुसुमा आणि हनुमंतरायप्पा यांना जबाबदार धरावे, असे पत्रातून कळवल्याचे मुनीरत्न यांनी सांगितले.

मुनीरत्न यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, मुनीरत्न यांच्यावर झालेल्या हल्ला विषयी तसेच त्यांनी केलेल्या आरोपीविषयी त्यांना कोणतीही माहिती नाही. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपण यावर बोलू.

मुनीरत्न 2019 मध्ये भाजपमध्ये

मुनीरत्न यांचा डीके बंधूंसोबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते. विधानसभा निवडणुकीत राजराजेश्वरी नगर मतदारसंघातून मुनीरत्न यांना पराभूत करण्यासाठी डीके बंधूंनी काँग्रेस उमेदवार कुसुमा यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता परंतु तरीही मुनीरत्न यांनी निवडणूक जिंकली. मुनीरथना यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

MLA Munirathna
Rambhadracharya : मोहन भागवतांवर रामभद्राचार्य भडकले; म्हणाले, 'धर्माची व्याख्या सांगणारे ते...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com