Karnatak Election : भाजपची प्रचार समिती जाहीर; नेतृत्व बोम्मईंकडे तरी वरचष्मा येडीयुरप्पांचाच !

J P Nadda : येडियुराप्पा यांना त्यांचे राजकीय वारसदार विजयेंद्र यांची राजकीय वाटचाल निश्चित करायचे आहे..
Karnatak Election : B S Yediyurappa : Basavraj Bommai : j P Nadda
Karnatak Election : B S Yediyurappa : Basavraj Bommai : j P NaddaSarkarnama
Published on
Updated on

Basavraj Bommai : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज (ता. १० फेब्रु ) कर्नाटक राज्याची (Karnatak BJP) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी २५ सदस्यीय निवडणूक प्रचार समिती जाहीर केली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई प्रचार समितीचे अध्यक्ष असतील, असे जाहीर करण्यात आले आहे.

नड्डा यांनी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांच्या अध्यक्षतेखालील १४ सदस्यीय निवडणूक व्यवस्थापन समितीलाही मान्यता दिली. २०१४ मध्ये लोकसभेत निवडून आल्यापासून राज्यातील भाजपच्या कारभारात त्यांची ही पहिली सक्रिय भूमिका आहे. दोन्ही समित्यांच्या स्थापनेतून लिंगायत आणि वक्कलिग या दोन प्रबळ समुदायांना जोडण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. लिंगायत समाजाचे दिग्गज नेते बी. एस. येडियुराप्पा यांना तसेच त्यांचा मुलगा आणि पक्षाचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनाही निवडणूक प्रचार समितीमध्ये स्थान मिळाले आहे. येडियुराप्पा यांचा वरचष्मा म्हणून याकडे पाहिले जाते .

Karnatak Election : B S Yediyurappa : Basavraj Bommai : j P Nadda
Nashik News; पाकिस्तानमधील परिस्थितीमुळे कांदा दर कोसळले?

भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यातील प्रमुख लिंगायत समाजावर पकड टिकवून ठेवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण झाले आहेत. तसेच, येडियुराप्पा यांना त्यांचे राजकीय वारसदार विजयेंद्र यांची राजकीय वाटचाल सुनिश्चित करायचे आहे, हेही आता गुपित राहिलेले नाही. करंदलांजे वक्कलिग समाजाच्या आहेत. निवडणूक व्यवस्थापन समितीच्या संयोजक या नात्याने त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. कारण पक्षाच्या निवडणूक अंमलबजावणीसाठी २० उपसमित्यांची स्थापना केली जाण्याची शक्यता आहे. करंदलाजे या आरएसएसच्या मुशीतून तयार झाल्या आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश कर्णिक यांनी करंदलाजे यांच्या नव्या भूमिकेबद्दल सांगितले की, तळागाळातील त्यांचे पूर्वीचे काम आणि पक्षाचे सरचिटणीस म्हणून राज्य आणि संघटनेशी त्यांची ओळख यामुळे त्यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे.पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना प्रचार समितीचे अध्यक्ष बनवल्याने बोम्मई यांना नेतृत्व करण्याची ही मोठी संधी आहे. बोम्मई कित्तूर कर्नाटकातील लिंगायत समाजाचे नेते आहेत.

Karnatak Election : B S Yediyurappa : Basavraj Bommai : j P Nadda
ED News: चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदमांना 'ईडी'कडून अटक; अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

जारकीहोळीनाही स्थान :

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासारख्या नेत्यांनाही सामावून घेण्यासाठी भाजपने समितीत जागा देण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनाही प्रचार समितीचे सदस्यत्व मिळाले आहे. व्यवस्थापन समितीसाठी भाजपच्या उपाध्यक्ष तेजस्विनी अनंतकुमार यांची निवड केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com