Free Uniform Scheme : शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; सरकारी शाळेतील १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

karnataka government vidyavikas yojana : कर्नाटक राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेशाचे कापड मोफत दिले जाणार आहे.
Free Uniform Scheme
Free Uniform Schemesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटकातील सरकारी शाळांमधील १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना २०२६-२७ मध्ये दोन जोड गणवेश मोफत दिले जाणार.

  2. ही योजना विद्याविकास योजनेअंतर्गत राबवली जाणार असून सविस्तर परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

  3. गणवेश वितरण प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे.

karnataka government yojana : राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्ष २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विद्याविकास योजनेअंतर्गत दोन जोड गणवेशाचे कापड मोफत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. यासंदर्भात आयुक्त कार्यालयाकडून सविस्तर परिपत्रक जारी केले असून, गणवेश पुरवठा आणि वितरण प्रक्रियेला यंदा अधिक शिस्तबद्ध चौकट देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये गणवेश कापडाचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. काही ठिकाणी दोन जोड पूर्ण गणवेश दिला जाणार असला, तरी काही विशिष्ट वर्गांसाठी एक जोड किंवा वेगळ्या प्रकारचे कापड देण्याची तरतूद केली आहे. सरकारकडून केवळ कापड मोफत दिले जाणार असून, शिवणकामाचा खर्च पालकांना करावा लागणार आहे. कापडाचा पुरवठा थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयांपर्यंत करायचा आहे. त्यानंतर ते कापड शाळांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर राहणार आहे.

या वाहतुकीसाठी प्रत्येक तालुक्याला २० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गणवेश कापड स्वीकारताना अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी, तारीख आणि कार्यालयीन शिक्का नोंदवणे बंधनकारक केले आहे. या प्रक्रियेत झालेल्या कोणत्याही त्रुटींसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार आहे. पुरवठा उशिरा झाल्यास संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूदही केली आहे.

Free Uniform Scheme
Karnataka-Marathi Issue: मराठीद्वेष की टेक्निकल चूक? कर्नाटकातील परीक्षेच्या निकालात घडला संतापजनक प्रकार

गणवेश वाटप केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडून स्वीकृती घेणे आणि तीन दिवसांच्या आत वापर प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. तसेच, उरलेला साठा तातडीने परत करण्याचे निर्देश दिले आहेत. मागील वर्षातील शिल्लक कापड आधी वापरण्याचेही स्पष्ट केले आहे. गणवेशाच्या गुणवत्तेबाबतही विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. प्रत्येक तालुक्यातून नमुने गोळा करून ते दोन आठवड्यांच्या आत तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या नमुन्यांमध्ये शर्ट, पॅन्ट, स्कर्ट, चुडीदार टॉप, बॉटम आणि दुपट्टा यांचा समावेश असणार आहे.

रोज देखरेख

योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी रोज देखरेख ठेवणार असून, आठवड्याला प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. वितरणात कोणतीही ढिलाई, साठा गोदामात पडून राहणे किंवा गैरवापर आढळल्यास कडक शिस्तभंग कारवाईचा इशाराही दिला आहे.

Free Uniform Scheme
Karnataka Politics : सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा पुन्हा तेजीत, शिवकुमारांची ताकद वाढली

FAQs :

1. कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार?
कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना.

2. किती गणवेश दिले जाणार आहेत?
प्रत्येक विद्यार्थ्याला दोन जोड गणवेशाचे कापड मोफत दिले जाणार आहे.

3. ही योजना कोणत्या वर्षासाठी लागू आहे?
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ही योजना लागू आहे.

4. ही योजना कोणत्या अंतर्गत राबवली जाते?
विद्याविकास योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाते.

5. वितरण प्रक्रियेत काय बदल झाले आहेत?
गणवेश पुरवठा आणि वितरण अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com