Tirupati Laddu : लाडू वादानंतर कर्नाटक सरकारने घेतला मोठा निर्णय; 34 हजार मंदिरांना दिला नवा आदेश

Political News : कर्नाटक सरकारच्या नवीन निर्देशानुसार, त्यांच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांना मंदिरातील दिवे लावणे, प्रसाद तयार करणे आणि ज्याठिकाणी भक्तांना भोजन दिले जाते त्याठिकाणी व यासारख्या धार्मिक विधींमध्ये फक्त नंदिनी तूप वापरण्यास सांगितले आहे.
Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Bengluru News : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात उपलब्ध असलेल्या लाडू प्रसादाच्या तुपात प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापरावरून खळबळ उडाली आहे. हा हिंदूंच्या श्रद्धेवरचा मोठा आघात असल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी या वादानंतर आता कर्नाटक सरकारही खडबडून जागे झाले असून आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

कर्नाटकच्या सिद्धरामय्या (Siddaramaiah) सरकारने याबाबत एक निर्देश जारी केले आहेत, राज्याच्या मंदिर व्यवस्थापन संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व 34 हजार मंदिरांमध्ये नंदिनी ब्रँड तूप वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटक सरकारच्या नवीन निर्देशानुसार, त्यांच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांना मंदिरातील दिवे लावणे, प्रसाद तयार करणे आणि ज्याठिकाणी भक्तांना भोजन दिले जाते त्याठिकाणी व यासारख्या धार्मिक विधींमध्ये फक्त नंदिनी तूप वापरण्यास सांगितले आहे. (Tirupati Laddu News)

कर्नाटक सरकारने मंदिरातील कर्मचाऱ्यांना प्रसादाच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड केली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटक राज्याच्या धार्मिक बंदोबस्त विभागांतर्गत सर्व अधिसूचित मंदिरांमध्ये, सेवा, दिवे आणि सर्व प्रकारचे प्रसाद तयार करण्यासाठी नंदिनी तूप वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तिरुपती येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापरावरून मोठ्या वादानंतर हे निर्देश आले आहेत.

Siddaramaiah
Supriya Sule : 'जय श्रीराम'च्या घोषणा अन् सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी उत्तर देऊ शकते, पण..."

दरम्यान, या प्रकारानंतर आंध्रप्रदेशचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आजी-माजी मुख्यमंत्री असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी (JaganMohan Reddy) यांच्यात तिरुमला तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरुन जुंपली आहे.

तिरुपती येथील मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी, बीफ टॅलो वापरले गेल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादावरुन उठलेल्या वादात आता साऊथचे फेमस अभिनेते प्रकाश राज यांनी उडी घेतली आहे.

Siddaramaiah
MVA News : काँग्रेस-ठाकरे-पवारांचं ठरलं; 288 जागांची चर्चा पूर्ण, 'या' फॉर्म्युल्यानुसार होणार जागावाटप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com