भाजपच्या वर्चस्वाला कॉंग्रेसचा सुरुंग : १३ आमदार, ४ खासदार अन् २ मंत्री असूनही केला पराभव

BJP | Congress | : स्वतः मुख्यमंत्री देखील आले होते उमेदवाराच्या प्रचाराला
Congress-BJP News
Congress-BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

बेळगाव : जिल्‍ह्यात १३ आमदार, चार खासदार व दोन मंत्री, शिवाय मतदारसंघात बागलकोट व विजापूर या जिल्ह्यांमध्ये वर्चस्व असूनही भाजपला (BJP) विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला आहे. वायव्य शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अरुण शहापूर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे. कॉंग्रसचे (Congress) उमेदवार प्रकाश हुक्केरी विजयी ठरले आहेत. हा पराभव भाजपच्याही चांगलाच जिव्हारी लागला आहे. पण, पदवीधर मतदारसंघातून हणमंत निराणी निवडून आल्यामुळे डिसेंबरमधील विधान परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती टळली आहे. (Karnataka Memeber of legislative council election)

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, विधान परिषद निवडणुकीसाठी आणि शहापूर व निराणी यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्यासह सर्व प्रमुख मंत्री बेळगावात आले होते. बागलकोट व विजापूर जिल्ह्यातही त्यांनी प्रचार केला. शहापूर यांच्या विजयासाठी तीन जिल्ह्यांतील प्रमुख शिक्षण संस्थांना भेटी देऊन त्यांनी संस्थाचालक व शिक्षकांशी संवाद साधला. तरीही शहापूर यांचा पराभव झाला. (Karnataka Memeber of legislative council election)

वायव्य शिक्षक मतदारसंघात बेळगाव, विजापूर व बागलकोट हे तीन जिल्हे येतात. या तिन्ही जिल्‍ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. बहुतेक आमदार व खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे, शिक्षक व पदवीधर या दोन्ही मतदारसंघात भाजपला विजय मिळेल असा दावा केला जात होता. पण, बेळगावात प्रचारासाठी आलेले माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शहापूर यांचे मताधिक्य कमी होईल असा दावा करुन खळबळ उडवून दिली. त्यामुळे, शिक्षक मतदारसंघात नकारात्मक चर्चा सुरु झाली.

या दाव्यानंतर स्वतः मुख्यमंत्री बोम्मई यांनी बेळगाव दौऱ्यावर आल्यानंतर सर्वप्रथम केएलईएस संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांची भेट घेतली. पण, जिल्ह्यातील भाजपचे आमदार शहापूर यांच्या प्रचारात फारसे सक्रिय नसल्याचे दिसले. जिल्ह्यात १८ पैकी १३ आमदार भाजपचे आहेत. लोकसभेचे ३ खासदार भाजपचे आहेत तर राज्यसभेचे खासदार इरण्णा कडाडीही बेळगाव जिल्ह्यातील आहेत. याशिवाय शशीकला जोल्ले, उमेश कत्ती मंत्री आहेत. त्यामुळे, जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे. ही ताकद निराणी यांच्या विजयासाठी वापरली गेली. पण, शहापूर यांच्या विजयासाठी वापरली गेली नाही हे निकालावरुन स्पष्ट दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com