Karnataka News : कर्नाटकसाठी भाजपने परंपरा मोडली, निवडणुकांचा भार पुन्हा येदीयुरप्पांवर!

Karnataka News : निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक भाजपमध्ये नेमकं शिजतंय काय?
Karnataka News :
Karnataka News : Sarkarnama

Karnataka News : कर्नाटक राज्यातील विधानसभा नजीक आले असताना, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (B S Yediyarappa) यांच्याशीही काल रात्री उशीरा सुमारे १५ मिनिटे एकांतात बातचीत केली आहे. येडियुरप्पा यांना पायउतार व्हावे लागले म्हणून मोदी-शहा यांनी मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची वर्णी लावली. मात्र ते हे अमर्याद भ्रष्टाचार व अन्य कारणांमुळे जोरदार टीकेचे धनी ठरत आहेत.

कर्नाटकातील भाजपच्या ‘मिशन १३६‘ साध्य करण्यासाठी ज्येष्ठ नेते येडियुरप्पा यांची आवश्यकता आहे. विद्यमान मुख्यमंत्री बोम्मई यांच्याइतके किंबहुना त्यांच्यापेक्षा ही अधिक महत्वाचे असणार हाच ‘संदेश' या दोन्ही नेत्यांच्या भेटीतून स्पष्ट होत आहे.

Karnataka News :
Bjp News: '' आता हरायचंच न्हाय!''; भाजपच्या जेपी नड्डांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले

या वर्षी एकूण ९ राज्यांमध्ये विधानसेभेच्या निवडणूक होणार आहे. यापैकी कर्नाटक हे एक महत्त्वपूर्ण राज्य आहे. तेलंगणा विधानसेभेतही चांगली कामगिरी केल्याशिवाय, भाजपला दक्षिणेत दाखविण्यासाठी पाचपैकी कर्नाटक एकमेव राज्य आहे. दिल्लीत होत असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा मुख्य अजेंडा हा, या नऊ राज्यांसाठी निवडणुकीची रणनीती आखणे हा आहे.

भाजपने नुकतेच माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा पक्षाच्या संसदीय मंडळात सहभाग करून घेतला. पुढील तीन-चार महिन्यांच्या कालावधीत कर्नाटकच्या निवडणुका पार पडणार आहे. भाजपसमोर आपली सत्ता राखण्याचे आव्हान असणार आहे. यासाठी भाजप वरिष्ठ नेतृत्वाला विद्यमा बोम्मई नव्हे तर चार वेळा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले व २०१९ नंतर राज्याच्या राजकारणातून बाजूला केलेले येदियुरप्पा यांच्याशिवाय भाजपपुढे पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन इत्यादींसाठी पंचाहत्तरी झाल्यानंतर सक्तीची निवृत्तीचे निकष मानला गेला. मात्र आता ८० वर्षे पार केलेल्या येदियुरप्पा यांच्याबाबत मात्र हा निकष शिथिल करण्यात आला. यातून आता येदीयुरप्पा यांचे राज्यातील राजकीय अपरिहार्यता लक्षात येते. कर्नाटकातील प्रमुखलिंगायत समाजावर येदियुरप्पा यांची घट्ट पकड अद्यापही मजबूत असल्याचे भाजप नेतृत्वाला वाटत आहे.यामुळेच येदियुरप्पा यांना मोदींनी वेळात वेळ काढून भेट दिली व बोम्मई आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांना राज्याचे प्रभारी सरचिटणीस अरुण सिंह यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले गेले. यामुळे हा संदेश आणखीच स्पष्ट समोर आल्याचे दिसून येते.

बोम्मई यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात आले आहेत. काँग्रेसने बोम्मईंविरूद्ध सुरू केलेल्या ‘पे-सीएम' मोहीमेला कर्नाटकच्या जनतेकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, असा माहिती दिल्लीत पोहचल्यावर भाजप नेतृत्वाने बोम्मईंबाबत दिल्याने भाजपने कमालीची सावधानता बाळगली आहे.

Karnataka News :
Shivsena Symbol News : शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने काढले खोडून...सिब्बल यांचा महत्त्वाचा युक्तीवाद

आपल्यावरील होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून लक्ष हटवण्यासाठीबोम्मई कधी महाराष्ट्राबाबत सीमवादाची तर कधी गोव्याची खोड काढतात. यामुळे प्रत्येक वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीत दोन्ही राज्यांच्या नेत्यांच्या बैठका घ्याव्या लागतात, हा मुद्दाही लक्षात आल्याचे भाजप सूत्रांनी सागितले.

कर्नाटक राज्याच्या २२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत अमित शाह यांनी राज्य भाजपला "मिशन १३६" चा नारा दिला आहे. कर्नाटक हे भाजपच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यात भाजपला तळागाळातही पाठिंबा मिळतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com