Congress Government:सिध्दरामय्या सरकारचा वादग्रस्त निर्णय; शिवाजी महाराजांचं नाव बदलून मेट्रो स्टेशनला ‘सेंट मेरी’ नाव; फडणवीसांनी काँग्रेसचा इतिहासच काढला

Karnataka Government : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून सातत्यानं महाराष्ट्राला डिवचण्याचे प्रकार सुरू असतात. आता पुन्हा एकदा कर्नाटकमधील सिध्दरामय्या सरकारनं वादग्रस्त निर्णय घेत महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का पोहोचवण्याचं काम केलं आहे.
Karnataka Government .jpg
Karnataka Government .jpgSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून सातत्यानं महाराष्ट्राला डिवचण्याचे प्रकार सुरू असतात. आता पुन्हा एकदा कर्नाटकमधील सिध्दरामय्या सरकारनं वादग्रस्त निर्णय घेत महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का पोहोचवण्याचं काम केलं आहे.

काँग्रेसचे (Congress) आमदार रिझवान अर्शद यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्नाटकातील मेट्रो स्टेशनला नाव देण्यात आले आहे. शिवाजीनगर असं या स्टेशनचं नाव आहे. पण आता या स्टेशनचे नाव शिवाजीनगर ऐवजी सेंट मेरी करण्याची मागणी काँग्रेसच्या आमदारानं केली आहे. विशेष म्हणजे या मागणीला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी तात्काळ संमतीही दर्शवली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी स्टेशन असे ठेवावे ही मागणी उचलून धरली आहे. त्यांनी याबाबत आपण केंद्र सरकारला पत्रही लिहिणार असल्याचं जाहीर करून टाकले आहे. या त्यांच्या निर्णयावरुन शिवप्रेमींसह महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केवळ महाराष्ट्र, भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात करण्यात येतो. यातच कर्नाटकात (Karnataka) आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मेट्रो स्टेशनला देण्यात आलं होतं. पण आता शिवाजीनगर स्टेशनचं नाव आता सेंट मेरी असं करावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्‍यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Karnataka Government .jpg
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: '...तर आज उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकत्र असते!'; सरकारमधील मंत्र्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या कर्नाटक सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, बंगळुरूतील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो. एक प्रकारे हा शिवरायांचा अपमान करण्याचं काम कर्नाटकचं काँग्रेस सरकार करतंय. मला याचं दु:ख आहे. पण याचं मला नवल वाटत नाही. कारण छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असल्यापासूनची टीकाही त्यांनी केली आहे.

तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात नेहरूंनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात त्यांनी जे मत व्यक्त केलं होतं ते सगळ्यांना माहिती आहे. तीच परंपरा कर्नाटक काँग्रेस सरकारमध्ये दिसत आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी,असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Karnataka Government .jpg
Election Commission:'स्थानिक'च्या निवडणुकांआधी निवडणूक आयोग 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजकीय पक्षांची धडधड वाढली

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्यांच्यामुळे या देशानं स्वराज्य पाहिलं, अशा छत्रपती शिवरायांचं नाव काढून धार्मिक विरोधी व्यवस्था उभी करून तेढ निर्माण केली जाणार नाही, अशी सुबुद्धी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मिळावी ,असा खोचक टोलाही फडणवीसांनी यावेळी सिध्दरामय्या यांना लगावला.

बंगळूरूमधील पिंकलाईनवरील आगामी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला सेंट मेरीचे नाव देण्याची मागणी समोर आली आहे. काँग्रेस आमदाराच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले. आता सिध्दरामय्या यांच्या या आश्वासनामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवप्रेमींमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या स्टेशनचं नाव बदलण्याचा हा प्रकार चुकीचा आणि अवमानकारक असल्याची टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com