Karnataka Election Result 2023 : नावात काय आहे ? ; नामसाधर्म्यामुळं काँग्रेसचा केवळ सोळा मतांनी पराभव..; भाजपची खेळी ?

karnataka soumya reddy vs soumya reddy : सौम्या रेड्डी यांचा भाजपचे उमेदवार सीके राममुर्ती यांनी पराभव केला आहे.
Karnataka Election Result 2023:
Karnataka Election Result 2023: Sarkarnama
Published on
Updated on

karnataka soumya reddy vs soumya reddy : नामसाधर्म्यामुळं काय होऊ शकते, याचा प्रत्यय पुन्हा कर्नाटकात आला. नावात काय आहे ? असं म्हणतात..पण जर तुम्ही निवडणुकीला उभे असालं तर नावात खूप काही आहे. नामसाधर्म्यामुळं तुम्ही निवडणुकीत पराभूतही होऊ शकता. (karnataka soumya reddy vs soumya reddy congress lost jayanagar seat by 16 votes to bjp)

२०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादीचे सुनील तटकरे श्रीवर्धनमधून उभे होते. त्यांच्याच नावाच्या एका अपक्ष उमेदवाराला दहा हजार मतं मिळाली आणि सुनील तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळं सारख्याच नावाच्या उमेदवारांनी निवडणुकीचं पारडं फिरुही शकतं.

कर्नाटक विधानसभेच्या निकालात बैंगलुरु येथील जयनगर विधानसभेच्या निकालाची राज्यभर चर्चा सुरु आहे. पुर्नमतमोजणीनंतर येथे काँगेसच्या उमेदवाराचा केवळ सोळा मतांनी भाजपच्या उमेदवाराने पराभव केला आहे. सर्वात कमी मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभव झालेला हा मतदारसंघ ठरला आहे.

Karnataka Election Result 2023:
Mallikarjun Kharge Summoned : 'बजरंगबली'मुळे मल्लिकार्जुन खर्गे संकटात ; प्रचारातील विधान अंगलट आलं..

काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांचा भाजपचे उमेदवार सीके राममुर्ती यांनी पराभव केला आहे. नावात साधर्म्य असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यांचा पराभव अपक्ष उमेदवार सौम्या रेड्डी यांच्यामुळे झाला आहे, भाजपनेच त्यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होते, असा आरोप काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी केला आहे. नावात साधर्म्य असल्यामुळे मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी भाजपने ही खेळी केली, असे रेड्डी म्हणाल्या.

Karnataka Election Result 2023:
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीसांमध्ये श्रेयवादावरुन लढाई ; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर फडणवीसाचं टि्वट.. म्हणाले...'

अपक्ष उमेदवार रेड्डी यांना ३२० मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या रेड्डी यांना ५७ हजार ७८१ मते मिळाली, तर भाजपच्या राममुर्ती यांना ५७ हजार ७९७ मते मिळाली आहेत. "मी निवडून येणार नाही, हे मला माहित होते, मला भाजपने उभे केले नव्हते. विधानसभा निवडणूक कशी असते याचा अनुभव घेण्यासाठी मी ही निवडणूक लढवली, असे अपक्ष उमेदवार रेड्डी यांनी सांगितले. त्यांनी प्रचार केला नाही, मतमोजणीच्या दिवशीही त्या घरीच होत्या. घरीच बसून त्या आँनलाइन निकाल पाहत होत्या.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंचा पराभव झाला होता. त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण होते त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली आणि त्यांच्याच मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारी व्यक्ती. तेव्हा सारख्या नावाच्या उमेदवारामुळे किती मोठा फटका बसू शकतो हे महाराष्ट्राला कळलं होते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com